आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहा कोटींचे हेरॉईन पकडणाऱ्या सहायक निरीक्षक खैरेंचा गौरव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी- येथील भूमिपुत्र व सध्या राज्य पोलिस सेवेमध्ये मुंबईत असलेले सहायक पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांनी ६ कोटी १५ लाख किमतीचे हेराॅईन आरोपीसह पकडून मोठे रॅकेट उघडकीस आणल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. 


राजस्थान येथील मांगीलाल मेघवाल ४ किलो १०० ग्रॅम हेराॅईनची विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिस निरीक्षक अनिल वाढवणे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल खैरे व त्यांच्या पथकाने आरोपीस अटक केली. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक खैरे करत असून या विशेष कामगिरीबद्दल त्यांचा मंुबईचे पोलिस आयुक्त दत्ता पडसीलकर यांनी नुकताच सन्मान केला. खैरे हे राहुरीचे रहिवासी असून पोलिस खात्यात नोकरी करण्यापूर्वी ते जिल्हा परिषदेच्या तांदुळवाडी शाळेत प्राथमिक शिक्षक होते. 

बातम्या आणखी आहेत...