आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरमध्येही कचऱ्याचा प्रश्न चिघळला; गाड्या अडवल्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- अाैरंगाबादपाठाेपाठ अाता नगरमध्येही कचरा डेपाेविराेधात अांदाेलन पेटले अाहे. सावेडी येथील कचरा डेपोमुळे परिसरात दुर्गंधी पसरल्याने या डेपोचे स्थलांतर करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  सोमवारी कचऱ्याच्या गाड्या अडवून  संताप व्यक्त केला. सावेडीत कचरा डेपोच नको, यासाठी पर्यायी जागा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यावर मनपा आयुक्त घनश्याम मंगळे यांनी आठ दिवसांत अविघटनशील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे लेखी आश्वासन दिले.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते संपत बारस्कर व नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांनी कचरा गाड्या वाहून आणणारी वाहने अडवली.  सावेडी हा भाग नगर शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. या भागाचा विकास झाल्यामुळे या भागात लोकवसाहत वाढली आहे. तपोवन रस्त्याच्या पलीकडे ग्रामपंचायत हद्दीतही आता लोकवस्ती वाढत आहे. सावेडी कचरा डेपो हा लोकवस्तीत आल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. कचरा डेपोसाठी मनपाकडे पर्यायी व्यवस्था नाही. बुरुडगावचा कचरा डेपो गेल्या ३ ते ४ महिन्यांपासून बंद आहे. संपूर्ण नगर शहराचा कचरा सावेडी येथील कचरा डेपोवर आणून टाकला जात आहे. या ठिकाणी कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया केली जात नाही, असाही अांदाेलकांचा आरोप अाहे. या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.  

 

८ दिवसांत विल्हेवाट लावणार : अायुक्त  
‘लोकसंख्या वाढ विचारात घेऊन मनपा हद्दीपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर पुढील २५ वर्षे पुरेशी होईल, इतक्या जागेची  मागणी करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सावेडी कचरा डेपो येथे साठवणूक केलेल्या अविघटनशील कचऱ्याची आठ दिवसांत विल्हेवाट लावण्यात येईल,’ असे लेखी अाश्वासन मनपा आयुक्तांनी अांदाेलकांना दिले.  

 

 

 

बातम्या आणखी आहेत...