आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामजन्मभूमीवर मंदिर उभे राहिलच : श्रीश्री रविशंकर यांची ग्वाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- आतापर्यंत आम्ही जे जे काम हाती घेतले, ते पूर्ण केले. दोन्ही समुदायाच्या सहयोगातूनच अयोध्या रामजन्मभूमीवर मंदिर उभे राहील, अशी ग्वाही श्रीश्री रविशंकर यांनी गुरुवारी अहमदनगरात दिली. सावेडीत उभारलेल्या आर्ट ऑफ लिव्हिंग ज्ञान मंदिराच्या लोकार्पणाआधी कार्यक्रमात बोलताना श्रीश्री रविशंकर यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.


श्रीश्री म्हणाले, ‘रामजन्मभूमीच्या प्रश्नात मी २००२ मध्ये लक्ष घातले. त्याआधी माझ्याकडे निर्मोही आखाडाचे नव्वदीतील प्रमुख मला म्हणाले, कोर्टात हा दावा चालू असून माझ्या हयातीत मंदिर उभे राहिलेले मी पाहू शकेन का? यानंतर मी दोन्ही समुदायांशी चर्चा सुरू केली. दरम्यान, शंकराचार्यांनी त्यात लक्ष घातल्याने मी बाजूला झालो. पण पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आता मी पुढाकार घेतला. पाचशेहून अधिक इमामांशी मी बोललो. धर्मशास्त्रानुसार वादग्रस्त जागेत नमाज पढला जात नाही, असे त्यांनी सांगितले. रामलल्ला तेथेच राहील, मशिदीसाठी स्वतंत्र जागा दिली तर प्रश्न सुटू शकेल, असे मला सांगितले गेलेे. कोर्टाचा निकाल मनांना जोडू शकत नाही. त्यामुळे समन्वयाने नक्की मार्ग काढता येईल.’

बातम्या आणखी आहेत...