आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोनई- आम आदमी पक्षाच्या २० आमदारांचे पद रद्द करण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे झाल्याचे मला पक्षाकडून काहीही कळवण्यात आले नाही. मला ते फक्त प्रसारमाध्यमांतून कळले. राज्यसभेच्या निवडणुकीपूर्वीच मला आमच्या व्हॉट्सअप ग्रूपमधून वगळण्यात आले, असे आपचे नेते व कवी कुमार विश्वास यांनी पत्रकारांना सांगितले.
कुमार विश्वास यांनी शनिवारी शनिशिंगणापूरला भेट दिली. उदासी महाराज मठात अभिषेक केल्यानंतर त्यांनी चौथऱ्यावर जाऊन शनिदर्शन घेतले. देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात माजी आमदार शंकरराव गडाख यांनी त्यांचा शाल, श्रीफळ व शनीची प्रतिमा देऊन सत्कार केला. यावेळी कुमार विश्वास यांच्यासमवेत दिनेश बावरा, कविता तिवारी उपस्थित होते. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना कुमार विश्वास यांनी सांगितले, ज्यांनी पक्षासाठी अओरात्र कष्ट घेतले, त्यांना निवडणुकीत संधी द्यावी, असे मी आपच्या बैठकीत सांगितले होते. काही तरुण, उच्चशिक्षित आमदारांना मंत्री करा, अशीही सूचना केली होती. परंतु मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले, हा माझा विशेष अधिकार आहे. याबाबत कुणी काही बोलू नये. राळेगणसिद्धी हे माझ्यासाठी तीर्थस्थान अाहे. अण्णा हजारे यांचे स्थान माझ्या मनात मोठे आहे, असेही कुमार विश्वास यांनी सांगितले. यावेळी देवस्थानच्या अध्यक्ष अनिता शेटे, विश्वस्त आदिनाथ शेटे, योगेश बानकर, अप्पासाहेब शेटे, शालिनी लांडे आदी उपस्थित होते. कुमार विश्वास यांनी शनिवारी शिर्डीला जाऊन साईसमाधीचेही दर्शन घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.