आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच दरोडेखोरांची टोळी जेरबंद; मांडवगण शिवारात कारवाई, एक फरार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- घोगरगाव येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पाचजणांची टोळी श्रीगोंदे पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने नगर-सोलापूर रस्त्यावर मांडवगण शिवारात शनिवारी रात्री जेरबंद केली. एक दरोडेखोर पळून गेला. पकडलेल्यांकडून चाकू, मिरची पूड, हेक्सा, लोखंडी पाइप, कटावणी असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. 


या टोळीची माहिती पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळाली. सहायक निरीक्षक नीलेश कांबळे, कॉन्स्टेबल प्रकाश वाघ, हवालदार अंकुश ढवळे, दादासाहेब टाके, उत्तम राऊत, अमोल कोतकर, किरण जाधव, किरण बोराडे, शीतल काळे,अविंदा जाधव, राजश्री चोपडे यांना मांडवगण शिवारात कारवाई करण्यास सांगण्यात आले. सहायक निरीक्षक कांबळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला मदतीसाठी बोलावून घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे देशमाने, कारखिले, बर्डे, हिंगडे, बनकर हे पथक मांडवगण शिवारात पोहोचले. रात्री साडेआठच्या सुमारास रघुनाथ घोडके यांच्या शेताजवळ काहीजण दबा धरून बसल्याचे दिसले. 


पोलिसांना पाहून ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करत पाच जणांना पकडले. एकजण अंधारात पळून गेला. रावसाहेब बासऱ्या काळे (कोंभळी, ता. कर्जत),बापू राजेकर ऊर्फ काळ्या काळे (रमजान चिंचोली, ता. कर्जत), डुपक्या कुंडलिक भोसले (थेरगाव, ता. कर्जत), दुईशेर मिनीनाथ भोसले (थेरगाव, कर्जत), रोहिदास नेहऱ्या काळे (घुमरी, ता. कर्जत) अशी आरोपींची नावे असल्याचे समजले. पळून गेलेला नाझ्या नेहऱ्या काळे (घुमरी) असल्याचे समजले. 


अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता 
या आरोपींकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी बांगरडा येथे झालेल्या जबरी चोरीच्या घटनेत याच आरोपींचा हात असल्याचा संशय असून पोलिस त्यादृष्टीने तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...