आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा; अॅप तयार करण्याचे अॅड. रोहिणी निघुते यांचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आश्वी- आजचे युग हे तंत्रज्ञानाचे अाहे. संगमनेर पंचायत समितीने तंत्रज्ञानाचा अवलंब करत जिल्हा परिषदेकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती गावपातळीवरील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करावा, असे आश्वी जिल्हा परिषद गटाच्या सदस्य अॅड. रोहिणी निघुते यांनी सांगितले. 


आश्वी खुर्द येथे आयोजित प्रभाग समिती सभेच्या अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. याप्रसंगी पंचायत समितीच्या सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे, दीपाली डेंगळे, गट विकास अधिकारी सुरेश शिदे, सचिव व्ही. एस. जोंधळे आदींसह विविध विभागांचे प्रमुख व परिसरातील सरपंच, ग्रामसेवक व सदस्य उपस्थित होते. 


अॅड. निघुते म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम शिक्षण विभागाने राबवावेत. आरोग्य विभागाने चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देत आरोग्य केद्रांतील स्वच्छतेबाबत सजग रहावे. कृषी विभागाने शासनाच्या योजना प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवव्यात. या योजनांचे अर्ज ग्रामपंचायतीत उपलब्ध करुन द्यावेत. नूतन सरपंच व सदस्यांना योजना व विकासकामांबाबत मार्गदर्शन करण्याच्या सूचना पंचायत समितीतील अधिकारी व ग्रामसेवकांना त्यांनी केल्या. यावेळी सभापती निशा कोकणे, उपसभापती नवनाथ अरगडे, पंचायत समिती सदस्य निवृत्ती सांगळे व गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनीही मार्गदर्शन केले. 

 

औषधांचा अपुरा पुरवठा शासनाकडूनच 
आश्वी परिसरात लाळ्या खरखूत साथ मोठ्या प्रमाणात अाहे. एका जनावराच्या आजारपणावर शेतक-याला सुमारे चार ते पाच हजार रुपये खर्च करावा लागतो. लस उपलब्ध नसल्याचे नागरिकांनी सांगितल्यावर शासनाकडून औषध पुरवठा अपुरा झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. पंचायत समितीने मुलींसाठी भाग्यश्री योजना व महिलांसाठी वाहन प्रशिक्षण योजना सुरु केल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या विविध योजनांचा लाभ कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहनही करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...