आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- छत्रपती शिवाजी महाराज व शिवजयंतीबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी उपमहापाैर श्रीपाद छिंदम सध्या जामीनावर अाहे. तोफखाना पोलिस ठाण्यात ताे रविवारी हजेरी लावणार हाेता. परंतु तो हजेरीसाठी आलाच नाही. तो जेथे असेल, तेथील नजिकच्या पोलिस ठाण्यात हजेरी लावण्यासाठी न्यायालयाने परवानगी दिली असल्याची माहिती तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी दिली.
आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर छिंदम याला तत्काळ अटक करण्यात आली होती. तसेच त्याची उपमहापाैरपदावरून व भाजपमधूनही हकालपट्टी करण्यात अाली हाेती. तोफखाना पोलिसांनी त्याच्याविरोधात धार्मिक भावना दुखावणे व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले अाहेत.
काही दिवसांंनी न्यायालयाने छिंदम याची सशर्त जामिनावर सुटका केली. त्याला नगरमधील तोफखाना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. छिंदम रविवारी तोफखाना ठाण्यात हजेरी लावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र प्रत्यक्षात ताे हजेरी लावण्यासाठी पाेलिस ठाण्यात अालाच नाही. सध्या ताे परराज्यात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे तेथील एखाद्या जवळच्या पोलिस ठाण्यात छिंदम याने हजेरी लावली असल्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.