आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिर्डी- शिलधी प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “साईरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, युवानेते डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात फटाक्यांच्या आतषबाजीत झाला. सलग १२ वर्षे पुरस्कार देण्याची परंपरा शिलधी प्रतिष्ठानने अखंडितपणे चालू ठेवली.
मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे, समाजसेविका डॉ.सुचेता धामणे, दानशूर साईभक्त सुधीरजी प्रभू, प्रगतिशील शेतकरी अमोल गाडेकर व नाट्यरसिक संच, शिर्डी यांना या वेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री विखे पाटील कारख्यान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील, प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते, नगराध्यक्षा योगिताताई शेळके, साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते आदी उपस्थित होते. या वेळी आशिष पवार दिग्दर्शित व किशोर चौघुले यांची प्रमुख भूमिका असलेले “शुभ दंगल सावधान’ नाटक सादर करण्यात आले. साईसमाधी शताब्दीनिमित्त “लेक वाचवा लेक शिकवा’ याचा अधिकाधिक प्रचार-प्रसार व्हावा यासाठी गतवर्षी जाहीर केल्याप्रमाणे वर्षभराच्या कालावधीत साईनाथ रुग्णालयात जन्मलेल्या मुलींच्या ९० मातांचा गौरव केला. नूतन मराठी वर्षानिमित्त दोन मातांचा या वेळी चांदीचे नाणे देऊन सन्मानित केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.