आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलीवर अत्याचार, परप्रांतीय तरूण ताब्यात; नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांत दिले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - शहरातील मोरगे वस्तीवर राहणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेवर शेजारी राहणाऱ्या परप्रांतीय तरुणाने लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी सोनू शर्मा याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले.

 

बुधवारी सायंकाळी वाजता हा प्रकार झाला. शर्मा हा उत्तर भारतातील रहिवासी आहे. तो मोरगे वस्तीवर आईसह राहतो. इमारतींना रंग देण्याचे काम तो करतो. सायंकाळी सातच्या सुमारास शर्मा याच्या आईने शेजारील पाच वर्षाच्या मुलीला जवळच असलेल्या दुकानातून दूध आणण्यासाठी पाठवले. मुलगी घरात आल्यानंतर आसपास कुणी नसल्याचे पाहून शर्मा याने मुलीशी लैंगिक चाळे सुरू केले.

 

हा प्रकार मुलीच्या आईच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले. नागरिकांनी शर्मा याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. रात्री आठच्या सुमारास शहर पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली होती. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...