आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेना-राष्ट्रवादीच्या फोडाफोडीला आला जोर; एकविरा चौकात आज राष्ट्रवादीचा मेळावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहर शिवसेना-राष्ट्रवादीला आतापासूनच महापालिका विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत. शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काहींचा प्रवेश घडवून सेनेने वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादीनेदेखील सेनेतील अनेकांना आपल्या पक्षाकडे ओढण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. 

 

पाइपलाइन रस्त्यावरील एकविरा चौकात गुरुवारी सायंकाळी वाजता होणाऱ्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सेनेचे माजी विभागप्रमुख तथा उद्योजक संजय बुधवंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते जाहीर प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप, संग्राम जगताप दादा कळमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हाेत असलेल्या या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
केडगाव येथील हर्षवर्धन कोतकर सावेडी उपनगरातील रवींद्र वाकळे यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकळे यांनी सेनेत प्रवेश केला. प्रोफेसर कॉलनी चौकात झालेल्या आदित्य ठाकरे यांच्या जाहीर सभेला सावेडी उपनगरातील तरुणांनी हजेरी लावली. सलग २५ वर्षे शहराचे आमदार असलेल्या अनिल राठोड यांना येत्या निवडणुकीत निवडून द्या, असे आवाहन ठाकरे यांनी या सभेत केले. शिवसेना आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागली असल्याचे ठाकरे यांच्या मेळाव्यातून स्पष्ट झाले. शिवसेनेने जाहीर सभा मेळावे घेत काही प्रवेश घडून आणले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेसची मुळेदेखील शहरात खोलवर रुजलेली आहेत. विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनी तीन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या शहर जिल्हाध्यक्षपदाची धूरा यशस्वीपणे सांभाळली, चौकाचौकात राष्ट्रवादीच्या शाखा सुरू करून गल्लीबोळात राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते निर्माण केले. विधानसभा निवडणुकीत जगताप यांना याच कामाचा फायदा झाला अन् ते आमदार झाले. परंतु आमदार झाल्यानंतरही जगताप यांनी आपले पक्ष संघटन मजबूत करण्याचे काम सुरूच ठेवले. सेनेला मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मरगळ आली होती. 


राठोड आता निवडणूक लढवणार नाहीत, असा गैरसमज झाल्याने सेनेच्या दुसऱ्या फळीतील अनेक पदाधिकाऱ्यांना आमदारकीच्या उमेदवारीचे डोहाळे लागले. परंतु शिवसेनेतर्फे आगामी विधानसभा निवडणूक आपणच लढवणार असल्याचे राठोड यांनी जाहीर केले. सेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीदेखील राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे आमदारकीच्या उमेदवारीचे स्वप्न पाहणाऱ्या सेनतील अनेकांचे अवसान गळाले. सेना-राष्ट्रवादीकडून आमदारकी कोण लढवणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्याचे राजकारण सुरू केले आहे. त्यांच्या या फोडाफाेडीच्या राजकारणात कार्यकर्त्यांना मात्र तेजीचे दिवस आतापासूनच आल्याचे सध्याचे चित्र आहे. 


अनिल राठोड यांची नव्या जोमाने तयारी 
सलग२५ वर्षे शहराचे आमदार राहिलेल्या राठोड यांना शिवसेना-भाजपच्या तुटलेल्या युतीचा फटका बसला. यावेळी मात्र राठोड यांनी भाजपला गृहित धरात आतापासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. नव्या जोमाने ते कामाला भिडले असून अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेशदेखील त्यांनी घडवून आणला. महापालिकेतील सत्ता राठोड यांच्याच हाती आहे. मात्र, राठोड यांचा बहुतांशी वेळ पक्षांतर्गत नाराजी एकमेकांच्या विरोधातील कुरघोड्या मिटवण्यातच खर्च होत आहे. 


संग्राम जगताप यांची पकड आणखी मजबूत 
राष्ट्रवादीचेआमदार संग्राम जगताप यांची पदाधिकारी कार्यकर्त्यांवर एकहाती पकड आहे. शहर जिल्हाध्यक्षपदी असताना त्यांनी संपूर्ण शहर पिंजून काढत कार्यकत्यांची मोठी फळी उभी केली. दोन वेळा महापौर आता आमदार असतानाही त्यांची पकड कायम आहे. त्यांनी ही पकड अधिक मजबूत करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. त्यात त्यांना यशही आले. िवशेष म्हणजे त्यांनी आपला आमदार निधी केवळ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांसाठीच वापरला नाही, तर सर्वच पक्षांच्या प्रभागासाठी दिला. 

बातम्या आणखी आहेत...