आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एएमटीचा ठेका रद्द करण्याचे आदेश, नवीन निविदा काढण्याच्या हालचाली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरातील एएमटी बससेवेत सुधारणा करण्यासाठी एक महिन्याची मुदत देऊनही त्यात सुधारणा झाली नाही, तसेच या सेवेंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीच्या पावत्याच सादर केल्याने एएमटी सेवेची बिलेही थांबवली आहेत, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार ही सेवा रद्द करण्याचे आदेश स्थायी समतीच्या सभापती सुवर्णा जाधव यांनी दिले आहेत.

 

नगरच्या वैभवात भर पाडणारी एएमटी सेवेचा बोजवारा उडाला आहे. बसेसची दूरवस्था झाली आहे. यासंदर्भात शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत जोरदार चर्चा झाली. सभापती जाधव यांनी बससेवेच्या स्थितीबाबत प्रशासनाला विचारणा केली. त्यावर यंत्र अभियंता परिमल निकम म्हणाले, बससेवा सुधारण्याबाबत एक महिन्याची मुदत दिली होती. पण त्यात अपेक्षेप्रमाणे सुधारणा झाली नाही. यासंदर्भात विधिज्ञांचेही मत घेतले आहे. संबंधित एजन्सीकडेे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी भरण्याबाबतच्या पावत्या नाहीत. त्यामुळे त्यांची बिले थांबवली आहेत.


ही सेवा रद्द करण्याचा अहवाल आयुक्तांना दिला आहे. सध्याच्या सेवेला नोटीस देऊन शहर बससेवेसाठी नवीन निविदा काढण्याचे ठरले होते, असे सांगितले. त्यावर सभापती जाधव यांनी ही सेवा बंद करण्याचे आदेश दिले. ही सेवा बंद झाल्यास नवीन निविदेला कसा प्रतिसाद मिळेल याचा अंदाज बांधणे अवघड आहे. परंतु, सध्याची शहर बससेवा खिळखिळी झाली आहे. शहरातील एएमटी थांब्यांवरील खुर्च्या चोरीला गेल्या आहेत. शहर बससेवेचा बोजवारा उडाला असला, तरी या सेवेसाठी पोषक वातावण निर्माण करण्यात प्रशासनही कमी पडल्याचे चित्र आहे.

 

बातम्या आणखी आहेत...