आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईबाबांचा मानवसेवेचा संदेश जगात पोहोचवा; उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे शिर्डीत आवाहन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी साई समाधीचे दर्शन घेतले. - Divya Marathi
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी साई समाधीचे दर्शन घेतले.

शिर्डी- श्री साई बाबांनी दिलेला मानवसेवा आणि एकात्मतेचा संदेश साईभक्तांनी जगभरात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. श्री साईबाबा संस्थानतर्फे साईनगर मैदानावर आयोजित जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 


उपराष्ट्रपती म्हणाले, साईबाबांनी कार्य, विचारातून अनेकांना ऊर्जा प्रदान केली. त्यांचा संदेश प्रेम, वात्सल्य, माणसाच्या हृदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून प्रेम केल्यास श्रद्धा, भक्तीचा संगम जीवनात होतो, अशा विचारांची प्रेरणा शिर्डी येथून मिळत असल्याचे समाधान वाटते. दुसऱ्या जागतिक साई मंदिर विश्वस्त परिषदेला भारतातील २४ राज्यांतील साई मंदिरांच्या विश्वस्तांनी हजेरी लावली. आंध्र ३१७, महाराष्ट्र १३९, उत्तर प्रदेश ११५, तामिळनाडू १०४ साई मंदिरांचा समावेश आहे. विदेशातील १९ देशांतील साई मंदिर विश्वस्तांनी हजेरी लावली. यात कॅनडा, हाँगकाँग, जपान, मलेशिया, नेदरलँड, श्रीलंका, अमेरिका, इंग्लंड या देशांचा समावेश आहे. नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, नगरपंचायतीच्या अध्यक्षा योगिता शेळके, हरिश्चंद्र अग्रवाल, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, अध्यक्ष सुरेश हावरे आदी याप्रसंगी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...