आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा परिसराचा चेहरा मोहरा बदलून टाकणार; उद्योजक वाल्मिक केंद्रे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भंडारदरा- भंडारदरा परिसर निसर्गरम्य असून, येथील पर्यटन विकास अजूनही झाला नाही, अशी खंत व्यक्त करतानाच तो अधिक प्रमाणात होऊन येथील आदिवासी तरुणांच्या महिलांच्या हाताला काम कसे मिळेल, यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करणार आहे. येथील निसर्गाचे संवर्धन करतानाचे शिक्षण आरोग्य याबरोबरच कौशल्य विकास योजनेतून रोजगार निर्मिती करण्याचा आपला उद्देश अाहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून या भंडारदरा परिसराचा चेहरामोहरा बदलून हे पर्यटनस्थळ जगाच्या पटलावर आणून त्यासाठी स्थानिक नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक यांनी योगदान देऊन आदिवासी भागाचा विकासासाठी मदत करावी. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या “बडे सपने देखो“ या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी दृष्टी स्वप्न मोठे ठेवून आयपीएस, शास्त्रज्ञ, जिल्हाधिकारी व्हावेच.मात्र, उत्कृष्ट शेती करून शेती उद्योजकही व्हावे, असे आवाहन उद्योजक वाल्मिक केंद्रे यांनी केले. 


भंडारदरा परिसरातील चिचोंडी या ठिकाणी केंद्रे यांनी बालमहोत्सवाचे आयोजन हेलिकॉप्टरने निसर्ग फेरफटका कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळी भारत सरकारचे कौशल्य विकासचे संचालक बाळासाहेब दराड, युवा उद्योजक गणेश मान, भाजपचे नाशिक शहर उपाध्यक्ष सुनील केदार, भारत दर्शनाचे प्रवक्ते नारायण फड, इतिहासकार संदीप तापकीर, उद्योजक सोमनाथ फुंदे, समीर थोरव, जमीर मुलाणी, योगेश काळजे, आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे, शिवसेनेचे सतीश भांगरे, युवा उद्योजक अमित भांगरे, संतोष मुर्तडक, पत्रकार कैलास शहा, सरपंच दिलीप भांगरे, सुरेश गभाले आदी उपस्थित होते. 
भंडारदरा परिसर निसर्गरम्य असून येथील आदिवासी धरणासाठी प्रकल्पासाठी विस्थापित झाला असून त्याच्या रोजी रोटीसाठी पर्यटन विकास व्हावा, हीच अपेक्षा वाल्मिक केंद्रे यांची असून, त्यांनी तसे प्रयत्न करताना या परिसरातील आदिवासी खेडे लव्हाळवाडी दत्तक घेतले असून येथील आदिवासी तरुणांना ते रोजगार उपलब्ध करून देणार आहेत. त्यामुळे त्यांना या भागातील माणसे मदतच करतील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशोकराव भांगरे यांनी दिले. स्वागत प्रास्ताविक उद्योजक केंद्रे यांनी केले. प्रसंगी बोलताना नासा संस्थेचे संशोधक भारत सरकारचे कौशल्य विकास आधारित योजनेचे संचालक बाळासाहेब दराडे यांनी, तर उद्योजक गणेश माने म्हणाले, केंद्रे यांनी मोठे धाडस दाखवून आदिवासी बाहुल्यात त्यांनी उद्योग उभारला असून, या भागातील जनतेने त्यासाठी मदत करावी त्यांच्या कामात आडकाठी करणाऱ्यांवर मात करून या आदिवासी भागातील रोजगार वाढवावा, इतिहासकार अकोले तालुका समृद्ध असून १२ गडकिल्ले आहेत. येथील पर्यटन वाढण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. 


यावेळी भाजपचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष सुनील केदार, डॉ . किरण लहामटे, सतीश भांगरे यांचीही भाषणे झाली. आदिवासी भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून येथे शेती पूरक योजना आणून महिलांच्या हाताला काम देऊन महिला सबलीकरण करणार आहोत, तसेच लव्हाळवाडी हे आदिवासी गाव दत्तक घेऊन तेथील सर्वांगीण प्रश्न सोडवू, असे केंद्रे यांनी यावेळी सांगितले. सूत्रसंचालन आभार नारायण फड यांनी मानले. चिचोंडी येथील रेनबो प्रकल्पाचे उद््घाटन ठकाबाबा गांगड मान्यवरांच्या हस्ते झाले, तर हेलिकाॅप्टर सेवा सुरू करण्यासाठी प्रथम ८७ वर्षांचे ठकाबाबा चिचोंडी गावचे बालचमू ज्ञानेश्वर वायाळ, मुस्कान मणियार, वैशाली मधे यांना प्रथम हेलिकाॅप्टरमध्ये बसवून भंडारदरा परिसराचा फेरफटका मारून उद््घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. 


विकासात अडथळे आणू नयेत 
आदिवासी भागात रोजगार निर्मिती पर्यटन विकास वाढवण्यासाठी केंद्रे प्रयत्न करीत आहेत. त्यांना अधिकारी पुढाऱ्यांनी आडकाठी आणू नये; अन्यथा आम्हालाही कायदा मोडावा लागेल. गेली ४० वर्षे या भागाचा विकास झाला नसून तो अलीकडच्या काळात होत अाहे. त्यातून दोन हजार तरुणांना त्यातून रोजगार उपलब्ध होत आहे याचा विचार होणे आवश्यक आहे. 
- डॉ.किरण लहामटे, आदिवासी नेते. 


अकोले तालुक्यातील चिचोंडी येथे बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंचे स्टॅाल्स लावण्यात आले होते. आदिवासींनी आपल्या मेहनतीने तयार केलेल्या या वस्तू पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या.
 

‘आता देवाने कधीही न्यावे’ 
लालबहादूरशास्त्री पंतप्रधान असताना आम्ही आदिवासी कोंबड नृत्य घेऊन होतो. कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला इमानातून फेरफटका मारा, असे सांगितलं व्हतं. पर आम्ही म्हटलो आपण मरून जाऊ, या भीतीपोटी बसलो नाही, पर तो योगआज ६० वर्षांनी माह्या गावालाच मिळाला याची मला लै आनंद वाटला. आता परमेश्वराने केव्हाही डोळे मिटून न्यावे, असे भावुक उद््गार ठकाबाबा यांनी काढले. 

बातम्या आणखी आहेत...