आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर-​सोलापूर महामार्गावर भीषण अपघातात मांडवगण फाटयाजवळ 3 जण ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर-   नगर-सोलापूर महामार्गावर मांडवगण फाटयाजवळ शनिवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या मालट्रक व कारच्या भीषण अपघातात निंबळक (ता. नगर) येथील तीन व्यावसायिक जागीच ठार झाले,तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. 

 

भैरवनाथ गायकवाड (वय 40), आत्माराम खरमाळे (वय 28)आणि जालिंदर भिल्लारे (वय 38. सर्व रा. निंबळक, ता. नगर)अशी मयतांची नावे आहेत. या अपघातात महेश काळसे हा तरूण जखमी झाला. ट्रकने जोराची धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. या कारमधील तिघेही जागीच गतप्राण झाले. या दुर्घटनेमुळे निंबळक गावावर शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...