आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोडफोड प्रकरणातील राष्ट्रवादीच्या ४१ आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या तोडफोड प्रकरणातील ४१ अारोपी सोमवारी सकाळी स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले. त्यात आजी - माजी नगरसेवकांचा समावेश आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चार दिवसांची (२४ मे पर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 


पोलिसांनी या तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या १२६ कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. घटनेच्या दिवशी २२ व उर्वरित कार्यकर्त्यांना मागील काही दिवसांत अटक करण्यात आली. त्यापैकी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह काहींना जामीन मिळाला. परंतु अन्य कार्यकर्ते अद्याप फरार होते. दरम्यान, दगडफेक प्रकरणी आरोपी असलेले काही शिवसेना कार्यकर्ते स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाले, तर काहींची धरपकड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेप्रमाणेच स्वत:हून हजर होणे पसंत केले. त्यासाठी रविवारी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांची बैठक झाली. त्यात स्वत:हून हजर होण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे ४१ आरोपी सोमवारी सकाळी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर झाले. त्यांच्या वैद्यकीय तपासणीनंतर आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 


हे आहेत आरोपी 
बाबासाहेब गाडळकर, कुमार वाकळे, महेश बुचडे, केरप्पा हुच्चे, अब्दुल वाहिद अब्दुल हामीद सय्यद, शादाब सय्यद, अशोक रोकडे, आवी इराबत्तीन, सागर शिंदे, धिरज उकीर्डे, निखिल वारे, समद खान, सुनिल त्रिंबके, बबलू सुर्यवंशी, संपत बारस्कर, मन्सूर सय्यद, सुरेश मेहतानी, सुहास शिरसाठ, सय्यद ख्वाजा, प्रकाश भागानगरे, वैभव ढाकणे, कुलदिप भिंगारदिवे, दत्तात्रय तापकिरे, बीर उर्फ दिलदारसिंग अजयसिंग शिख, फारुख रंगरेज, चंद्रकांत औशीकर, अरविंद शिंदे, सत्यजीत ढवण, वैभव जाधव, शेख रफियोद्दिन, राहुल शर्मा, मयूर बांगरे, किरण पिसोरे, दीपक सूळ, घनश्याम बोडखे, बाबासाहेब जपकर, राजेंद्र ससे, वैभव दारुणकर, अक्षय डाके, मयूर कुलथे, अविनाश घुले. 


कोठडी झाली पुन्हा हाऊसफुल्ल 
तोडफोड प्रकरणात पोलिस कोठडी सुनावलेल्या सर्व आरोपींची एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कोठडीत रवानगी करण्यात आली. या कोठडीत केवळ ५२ आरोपी ठेवण्याची क्षमता आहे. आधीच या कोठडीत काही आरोपी आहेत, त्यात तोडफोड प्रकरणातील ४१ आरोपींची याच कोठडीत रवानगी झाल्याने ही कोठडी हाऊसफुल्ल झाली आहे. भिमा कोरेगाव घटनेनंतर नगरमध्ये झालेल्या दगडफेक प्रकरणात अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आले होते, तेव्हा आरोपी ठेवण्यासाठी कोठडीत जागा शिल्लक नव्हती. पोलिसांनी आरोपींना व्हॅनमध्ये बंदिस्त करून ठेवले होते. 

बातम्या आणखी आहेत...