आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालम टाकळी ग्रा.पं. साठी 85 टक्के मतदान; 3468 मतदारांनी बजावला हक्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालम टाकळी/शेवगाव- शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अतिसंवेदनशील असलेल्या बालम टाकळीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत ८५ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ४०६५ पैकी ३४६८ मतदारांनी हक्क बजावला. 


प्रभागनिहाय झालेले मतदान - प्रभाग एक - ८६६ पैकी ७२०, प्रभाग दोन - ७९९ पैकी ७००, प्रभाग तीन - ६८७ पैकी ५९८, प्रभाग चार - ९५७ पैकी ८०६, प्रभाग पाच - ७६५ पैकी ६४४. पाच प्रभागांत २६ उमेदवार रिंगणात होते. सरपंचपदासाठी तिघे निवडणूक लढवत होते. बुधवारी मतमोजणी होणार आहे. निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. कोणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तरुण मतदार महिला वर्गात निवडणुकीविषयी मोठी उत्सुकता आहे. 


प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक पौर्णिमा तावरे, उपअधीक्षक अभिजित शिवथरे, तहसीलदार दीपक पाटील, निरीक्षक गोविंद ओमासे, सहायक निरीक्षक नितीन मगर यांनी मतदान केंद्रांना भेट दिली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अरुण कुलकर्णी यांनी काम पाहिले. 


विक्रमी मतदान 
दुसऱ्याटप्प्यातील १० ग्रामपंचायत निवडणुकांत विक्रमी मतदान झाले. तालुक्याच्या पूर्व भागातील बोधेगाव ग्रामपंचायतीचे मतदान सायंकाळी सातपर्यंत चालू होते. मतदान पुढीलप्रमाणे - भगूर ८९ टक्के, शहर टाकळी ८४ , मुंगी ७७.६४, बालम टाकळी- ८५.३४, खरडगाव ८८.६९, ढोरसडे ८४.१२, हिंगणगावने ८७.२४, कऱ्हेटाकळी ८७.८६, वरूर ९०.७१, बोधेगाव ७९.५८ टक्के. मतमोजणी बुधवारी सकाळी नऊ वाजता तहसील कार्यालयात सुरू होणार असून सर्व तयारी झाल्याची माहिती तहसीलदार दीपक पाटील यांनी दिली. सरपंचपदाची निवड थेट जनतेतून असल्याने दहापैकी चार महिला सरपंचपदासाठी लढत असल्याने निकालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. 


उपअधीक्षक अभिजित शिवथरे, तहसीलदार दीपक पाटील, निरीक्षक गोविंद ओमासे, सहायक निरीक्षक नितीन मगर यांनी शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील मतदान केंद्रांना भेट दिली. 

बातम्या आणखी आहेत...