आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी झाल्यास 'रोहयो'ची कामे उपलब्ध करून द्या; आमदार बाळासाहेब थाेरात यांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- फसलेल्या जलयुक्त शिवारामुळे संगमनेरच्या पठार भागातील काही गावांत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. आमदार बाळासाहेब थोरात यांनी या गावातील ग्रामस्थांशी गाठीभेटी घेत संवाद साधत त्यांनी व्यक्तिगत समस्यादेखील ऐकून घेतल्या. टँकरसंदर्भात आढावा घेत त्यांनी मागणी झाल्यास तातडीने रोहयोची कामे या भागात उपलब्ध करून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. 


थोरात यांनी पठार भागातील ग्रामस्थांना आवश्यक नेमून दिलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर वेळेत पुरवला जातो का? याची पाहणी करत गावातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. पठार भागातील रणखांब, खरशिंदे, खांबे, दरेवाडी, कुंभारवाडी या गावांतील ग्रामस्थांच्या समस्या थोरात यांनी जाणून घेतल्या. बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे त्यांच्यासोबत होते. 


थोरात यांनी पंचायत समितीत घेतलेल्या टंचाई आढावा बैठकीमध्ये तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांना तातडीने टँकरने पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले होते. त्याचा परिपाक म्हणून पठार भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असून यात प्रशासनाने सातत्य ठेवले आहे. आवश्यकता भासल्यास संगमनेर तालुका दूध संघाचे टँकरदेखील पाणी भरून पाठवले जात आहेत. 'यशोधन' या आपल्या संपर्क कार्यालयामार्फत येथील ग्रामस्थांच्या प्रलंबित कामांना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गणनिहाय जनसेवकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून ती कामे करतात की नाही याचीदेखील खातरजमा त्यांनी केली. जनसेवकांमार्फत शालेय विद्यार्थ्यांचे दाखले तातडीने काढून दिले जात असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. 


थोरात म्हणाले, तालुक्यात आपण सातत्याने विकास कामे राबवली. रस्ते व विजेचे जाळे निर्माण केले. सहकारी संस्थांमुळे ग्रामीण विकासाला बळकटी मिळाली. वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. थोरात यांनी नवनाथ गुळवे यांच्या कुटुंबीयांचीही यावेळी भेट घेतली. 

बातम्या आणखी आहेत...