आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा घाट : चौधरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - मनपातील सत्ताधारी गटाने शाळांना अनिवासी कर आकारणी करणे म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना चांगल्या शाळांत प्रवेशापासून वंचित ठेवण्याचाच प्रकार आहे, असा आरोप कॉग्रेसचे महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी केला आहे. 

दिव्य मराठीने २५ एप्रिलला शाळांवर अनिवासी कराची आकारणी केल्याने शिक्षण महागणार,या आशयाचे वृत्त प्रकाशित केले होते. या अनुषंगानेच कॉग्रेस महानगराध्यक्ष बबनराव चौधरी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, निवासी मालमत्तांवर जास्त कर आकारल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. आता शाळांवर अनिवासी कराची आकारणी केल्याने अनुदानित शाळांना कराचा भरणा कसा करावा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर वाढीव कराची रक्कम खासगी शाळा पालकांच्याच खिशातून काढणार असल्याने खासगी शाळांमधील प्रवेश शुल्क वाढण्याची भीती नाकारता येत नाही. शाळा या उद्याची पिढी घडवण्याचे पवित्र कार्य करतात. शाळांच्या करात वाढ करुन सत्ताधारी गटाने या कार्यालाच सुरुंग लावला आहे. हा प्रकार नागरिकांना वेठीस धरण्यासारखाच आहे. कॉग्रेस सर्वांना सोबत घेवून शाळांचा वाढलेला कर कमी करण्यासाठी प्रयत्न करेन. मात्र सत्ताधारी गटानेही नागरिकांचा अंत पाहु नये. नागरिकांच्या पाल्यांना चांगल्या शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी शाळांवर लादलेला कर कमी करावा, अशी मागणी बबनराव चौधरी यांनी कॉग्रेसच्या वतीने केली आहे. 


ब्लड बँकेलाही करातून सुट द्यावी : मनपाने केवळ शाळांचाच कर वाढवला नाही, तर निःस्वार्थपणे अत्यल्प दरात रक्त उपलब्ध करुन देणाऱ्या ब्लड बॅकांवरही व्यावसायिक कराची आकारणी केली आहे. परिणामी रक्ताच्या थैलीचे भाव देखील वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकारही नागरिकांची मुस्कटदाबी करणारा आहे.त्यामुळे महापालिकेने ब्लड बँकेलाही करात सुट द्यावी, अशी मागणी बबनराव चौधरी यांनी केली आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...