आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धूमस्टाईल लांबवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- मोटारसायकलीवर धूमस्टाईल आलेल्या दोघा सराईत भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६० हजार रूपये किमतीचे सोन्याचे गंठण लांबवले. यापूर्वी नगर-मनमाड राज्यमार्गावर गंठणचोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. मंगळवारी शहरातील बाजारपेठेलाच चोरांनी लक्ष्य केल्याने पोलिसांसाठी हे आव्हान समजले जात आहे. 


शहरातील अझीम किराणा दुकानासमोर दुपारी साडेतीन वाजता गंठणचोरीची घटना घडली. ज्योती आकडे या रस्त्याने घरी जात असताना विनाक्रमांकाच्या पल्सर मोटारसायकलीवर पाठीमागून आलेल्या दोघा भामट्यांनी त्यंाच्या गळ्यातील गंठण ओरबाडून पळ काढला. 
अचानक घडलेल्या घटनेने गोंधळून गेलेल्या या महिलेने आरडाओरड केला. मात्र, गंठणचोर शहरातील प्रगती शाळा रस्त्याने पसार झाले. राहुरी शहरातील बसस्थानक, स्टेट बँक परिसर, पाण्याची टाकी, नूतन मराठी शाळा या रस्त्यावर महिलांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण, तसेच बँकेतून काढलेले पैसे पाळत ठेवून पळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांचा अद्याप तपास नसतानाच गंठणचोरांनी गजबजलेल्या बाजारपेठेला लक्ष्य केले आहे. 


शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ६ पोलिसांची नियुक्ती आहे. मात्र, आजवर एकाही पोलिसाने शहरात गस्त घातलेली नाही. शहरात विनाक्रमांकाच्या मोटरसायकलींची संख्या उदंड झाली आहे. तीन सीट बसवून कर्णकर्कश आवाजात बाजारपेठेत धूमस्टाईल मोटरसायकली पळवण्याचे फॅड वाढले आहे. दरम्यान, या चोऱ्यांना तातडीने आळा घालण्याची मागणी शहरातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...