आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एचआयव्हीबाधितांचा सामूहिक विवाह; येत्या 15 डिसेंबरला आयोजन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जागतिक एडस सप्ताहनिमित्त स्नेहालयाच्या केरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने डिसेंबरला सहजीवनाची ओढ असणाऱ्या एच. आय. व्ही. संसर्गितांच्या राज्यस्तरीय वधू - वर परिचय मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी ३०० पेक्षा जास्त वधू - वरांनी आपली नावनोंदणी केली होती. या कार्यक्रमात एकूण वधू - वरांनी लग्न करण्याचे ठरवले. १५ डिसेंबरला दुपारी १२.३५ वाजता स्नेहालय पुनर्वसन संकुल, एमआयडीसी येथे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेे आहे, अशी माहिती स्नेहालयाचे सहसंचालक प्रवीण मुत्याल यांनी दिली. 


या शुभघडीचे अौचित्य साधून आपण या अनोख्या अलौकिक अशा महत्वपूर्ण लग्न सोहळ्यात सहभागी होऊन वधू - वरांना शुभाशीर्वाद द्यावे, अशी विनंती स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रमुख शिल्पा केदारी यांनी केली. 


सामुदायिक विवाह सोहळ्यातील वधू स्नेहालय संस्थेच्या लाभार्थी आहेत. या वधुंचे कन्यादान करण्यासाठी नगरमधील नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन भरत कुलकर्णी यांनी केले. सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी समाजातील नागरिकांनी कपडे, भांडे, फर्निचर, कपाट, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दिवाण, सूटकेस, रुखवत सामान नव दाम्पत्य यांना भेटवस्तू म्हणून स्वहस्ते सहयोग द्यावे, अशी विनंती स्नेहालय जनसंपर्क कार्यालयाचे कार्यकर्ते सचिन ढोरमले आणि विष्णू आंबेकर यांनी केले. 


कार्यक्रमाविषयी अधिक माहिती हवी असल्यास ९०११०५२७८८, ९०११०२०१७८, ९०११३६३६०० या क्रमांकावर संपर्क साधावे, असे स्नेहालयाचे सहसंचालक प्रवीण मुत्याल यांनी सांगितले. एचआयव्हीबाधितांचे विवाह यापूर्वीही लावण्यात आले असून ही दाम्पत्ये सुखाने संसार करत आहेत. 

 

स्नेहालय संस्थेने अशा व्यक्तींसाठी हिंमतग्राम प्रकल्प उभारला असून तेथे निवासाबरोबर विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतीत विविध प्रयोग केले जात असून त्यातून उत्पन्नही मिळू लागले आहे. भविष्यात आणखी व्यापक योजना राबवण्याचा संस्थेचा मानस आहे. 

बातम्या आणखी आहेत...