आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संतुलनासाठी ‘वन्यजीव’ आदिवासीत समन्वय ठेवा; मंत्री मधुकर पिचड यांची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- हरिश्चंद्र गडावरील वनसंवर्धन पर्यावरण संतूलन बिघडू नये, म्हणून स्थानिक वन समितीला सर्वाधिकार द्यावेत, स्थनिक आदिवासींना रोजगारासाठी संधी उपलब्ध करून द्यावी, पर्यावरण संतूलनाच्या दृष्टीने वन्यजीव विभाग स्थनिक आदिवासी यांचा समन्वय ठेवावा, अशी अपेक्षा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केली. 


पिचड यांनी हरिश्चंद्रगडप्रश्नी घेतलेल्या बैठकीस सहायक वनसंरक्षक एस. ए. ठाकरे, वन्यजीव विभाग भंडारदऱ्यांचे वनपरिक्षेत्र डी. डी. पडवळे, राजूर विभागाचे अमोल आडे, वनपाल एस. पी. गायकवाड, वनरक्षक व्ही. एन. कोळी गडावर गाईडचे काम करणारे आदिवासी तरूण उपस्थित होते. 


हरिश्चंद्रगडावर तात्पुरत्या स्वरूपात व्यवसाय कारणाऱ्या आदिवासींना वन्यजीव विभागाने मज्जाव केला आहे. याप्रश्नी १३ ला वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक प्रवीण कुमार यांच्या कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. विविध मुद्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली. 


गडावर पर्यावरण संतूलन वन संवर्धनासाठी पाचनई गावच्या वनव्यवस्थापन समितीला सर्वाधिकार द्यावेत, अशी मागणी पिचड यांनी केली. योग्य नियोजन केल्यास आणि पर्यटकांनाही काही आचारसंहिता घालून दिल्यास वन्यजीव विभागाचा हेतू साध्य होईल, असे पिचड म्हणाले. 


कचरा कारणाऱ्या पर्यटकांना वनव्यवस्थापन समितीला दंड करण्याचा अधिकार द्या. ठिकठिकाणी सूचना फलक लावा. गावात असणा-या गाईड कामांचे नियोजन वनव्यवस्थापन समितीने करावे. पर्यटकांना गडावर चढण्यासाठी नैसर्गिक पाऊलवाटा ऐवजी दगडी पायरी कराव्यात, अशाही सूचना त्यांनी केल्या. 


ठाकरे म्हणाले, हरिचंद्रगड हा अभयारण्याचा भाग असून त्यामुळे अनेक बाबींवर इथे कायद्यानेच बंधने आहेत. परंतू स्थानिक आदिवासींच्या सहकार-याने वन संवर्धनातंर्गत काही बाबी इथे करता येतील काय, याचा विचार वन्यजीव विभाग सकारात्मक दृष्टीने करीत आहे. 


कळसूबाई - हरिचंद्रगड अभयारण्यात प्रवेश करण्यासाठी फी आकारली जाते. यातून भंडारदरा स्थानिक व्यवस्थापन समितीकडे सुमारे २२ लक्ष रुपये जमा आहेत. याप्रमाणेच हरिश्चंद्र गडावर पर्यटकांना प्रवेश मूल्य आकारल्यास मोठा निधी गोळा होईल. यातून विविध वनसंवर्धनाची कामे करता येतील, असे वनपरिक्षेत्रपाल डी. डी. पडवळे यांनी सांगितले. या बैठकीस उपस्थित असलेल्या आदिवासी युवकांनी आपले विविध प्रश्न मांडले. त्यांची दखल अधिकाऱ्यांनी घेतली. 


टोलनाक्यावर पर्यटकांची तपासणी करा 
हरिचंद्रगडावर जाण्यासाठी तोलार खिंड, पाचनई, खिरेश्वर येथे टोलनाके करावेत, टोलनाक्यावरच पर्यटकांची तपासणी करून प्रवेश द्यावा मूल्य आकारावे, कचरा करणाऱ्या पर्यटकाला ५०० रुपये दंड करावा, उपद्रवी दंडही स्वतंत्र आकारावा, कॅमेऱ्यासाठी शुल्क आकारावे, वनसंवर्धनांतर्गत आदिवासींना गडावर स्टॉलसाठी मुभा द्यावी, पर्यटकांना गडावर अन्न शिजवण्यास मनाई करावी, दगडी कचराकुंड्या कराव्यात, गाईड म्हणून काम करणाऱ्या आदिवासी तरुणांना ड्रेस कोड ओळखपत्र द्यावेत, पर्यटकांना गाईडशिवाय प्रवेश देऊ नये, गाईडचे मानधन वनव्यवस्थापन समितीने ठरवून दिले तेवढेच द्यावे, त्यातला काही भाग गाईडने वनव्यवस्थापन समितीला द्यावा अशा बाबी यावेळी उपस्थित करण्यात आल्या. 

बातम्या आणखी आहेत...