आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार गांधींच्या बंगल्याच्या अतिक्रमणाची अखेर मोजणी; न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाला जाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या बंगल्याच्या संरक्षक भिंतीच्या अतिक्रमणाबाबत विनोद गांधी यांनी याचिका दाखल केली होती. मोजणी करून याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिल्यानंतर मंगळवारी या जागेची मोजणी करण्यात आली.


कोठी ते यश पॅलेस रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर मनपाच्या अतिक्रमणविरोधी  विभागाने गांधी यांना १३ जून २०१६ रोजी अतिक्रमण सात  दिवसांत काढण्यासाठी नोटीस बजावली होती. मात्र मुदत संपल्यानंतर  प्रशासनाला हे अतिक्रमण काढण्याचे धाडस झाले नाही. विनोद गांधी यांनी महापालिका प्रशासन, नगरविकास खाते, मुख्यमंत्र्यांकडेही पाठपुरावा केला, तरीही अतिक्रमण काढले गेले नाही. त्यामुळे  त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. 


मोजमाप करून २६ फेब्रुवारीपर्यंत अहवाल देण्याचे आदेश कोर्टाने ३१ जानेवारीला मनपाला दिले. त्यानंतर प्रशासनाने मंगळवारी मोजणी केली. मनपा नगरचना िवभागाचे सहायक संचालक एस. डी. धोंगडे, श्याम सासवडकर, आर. व्ही. जेवरे, के. एफ पठाण यांच्या उपस्थितीत मोजणी झाली. यावेळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.  मोजणी करण्यात आली, पण अतिक्रमण किती आहे हे आकडे जुळवल्यानंतर समोर येईल, असे धोंगडे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...