आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच हजार शाळा बंद करण्याचा निर्णय दुर्दैवी; आमदार बाळासाहेब थोरात यांची सरकारवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- अडचणीच्या काळात सरकारने आईच्या शेतकरी आणि जनतेच्या पाठीशी उभे राहायला हवे. बोंडअळीचा प्रादुर्भाव, ऊसप्रश्न, तसेच राज्यातील हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय अत्यंत दुर्दैवी बेकायदा असल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

 
हिवाळी अधिवेशनाच्या तांेडावर आमदार थोरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले, कायद्याने प्रत्येक बालकाला मूलभूत शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. चौदा वर्षांपर्यतचे शिक्षण मोफत आणि सक्तीचे असताना राज्य सरकारने पटसंख्येचे कारण दाखवत राज्यातील पाच हजार शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मुळातच या शाळा डोंगराळ आणि दुर्गम भागात असल्याने तेथे पर्यायाने पटसंख्या कमीच असणार आहे. 


एक किलोमीटरच्या आत शाळा असणे आवश्यक आहे. मात्र, सरकारने पहिल्या टप्प्यात १३१४ शाळा बंद केल्याने सहा वर्षांचे लहान मूल शिक्षणासाठी तीन किलोमीटर कसे जाईल? प्रत्येक बालकास शिक्षण मिळावयास हवे, ही जबाबदारी सरकारची आहे. 


ऊसदरासंदर्भात ठोस भूमिका आवश्यक आहे. राज्य केंद्र सरकारने कारखान्यांना अनुदान द्यायला हवे. ग्राहकांना साखर स्वस्त द्यावी, मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील त्यांचा योग्य मोबदला मिळायला हवा, असे थोरात यांनी सांगितले. 


...तर विद्यार्थ्यांसमवेत तीव्र आंदोलन : पिचड 
राज्य सरकार शाळा बंद करून ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे आदेश देते. ग्रामीण आदिवासी विद्यार्थ्यांनी मग शिकायचे कसे? सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे शिक्षणाच्या हक्कापासून विद्यार्थ्यांना वंचित राहतील. फडणवीस सरकारने शिक्षणाचा खेळखंडोबा असाच सुरू ठेवला, तर विद्यार्थ्यांसमवेत तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी अकोल्यात बाेलताना दिला. 


गुजरात राज्यात काँग्रेसचेच सरकार 
भाजप सरकारचे ‘अच्छे दिन’चे स्वप्न हवेत विरले अाहे. काँग्रेसने सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात जनतेच्या िवकासाचे काम केले आहे. खासदार राहुल गांधी यांनी पक्षात नवचैतन्य निर्माण केले आहे. गुजरातमध्येदेखील काँग्रेसचेच सरकार सत्तेवर येईल. महाराष्ट्रातदेखील पुढचे सरकार काँग्रेसचेच असेल, असा विश्वास आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना रविवारी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...