आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाचजणांच्या जामीनअर्जावर आज निर्णय

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पोलिस अधीक्षक कार्यालयातील तोडफोड प्रकरणातील संशयित आरोपी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह पाच जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. 


केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणानंतर पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात आमदार कर्डिलेही आले. त्यानंतर झालेल्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी आमदार जगताप यांना अटक केली. त्यानंतर आमदार कर्डिले यांनाही अटक करण्यात आली. कर्डिले यांच्यासह वकील प्रसन्न जोशी, संजय वाल्हेकर, सागर वाव्हळ, अलका मुंदडा यांनी जामिनासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, शनिवारी या अर्जावर सुनावणी होऊ शकली नाही. सोमवारी या अर्जावर सुनावणी झाली. जामिनावरील अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला. मंगळवारी यावर अंतिम निर्णय होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...