आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मद्यधुंद पोलिस उपनिरीक्षकाचा बिअर बारमध्ये धिंगाणा, मालकासह सहकारी पोलिसाला मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- मद्यधुंद पोलिस उपनिरीक्षकाने बिअर बारमध्ये बिलाच्या वादातून धिंगाणा घातल्याची घटना घडली आहे. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर मध्यस्थी करण्यास गेलेल्या मालक आणि पीएसआयलादेखील त्याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून धक्काबुक्की केली. पाथर्डी येथील मधुबन परमिट रूममध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अमोल मालुसरे असे उपनिरीक्षकाचे नाव असून तो गेवराई पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. याप्रकरणी पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी उपनिरीक्षक अमोल मालुसरे याला अटक करण्यात आली. 


अमोल मालुसरे हा सहकाऱ्यांसोबत बिअर बारमध्ये दारू पिण्यास गेला होता. मद्यपान झाल्यानंतर बिल पाहून मालुसरेचा पारा चढला. दारूच्या नशेत त्याने खिशातील रिव्हॉल्व्हर काढून मालकाला धमकावण्यास सुरूवात केली. बारच्या काउंटरवर रिव्हॉल्व्हर आपटून तिचे तुकडे केले. दरम्यान भांडण सोडवायला गेलेल्या मलाक आणि सहकारी पोलिसालाही त्याने मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...