आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपहरण, खंडणीची मागणी; BJP खासदार दिलीप गांधीवर 24 तासांत गुन्हा दाखल करण्याचे HC चे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- फोर्ड शोरूममधील मॅनेजर व सेल्स मॅनेजर यांचे अपहरण, त्यांना मारहाण करणे व खंडणीची मागणी करण्याच्या तक्रारीवरून खासदार दिलीप गांधी, त्यांचे चिरंजीव नगरसेवक सुवेंद्र, कार्यकर्ता पवन गांधी, सचिन गायकवाड यांच्याविरोधात २४ तासांच्या आत गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शुक्रवारी पोलिस महानिरीक्षकांना दिले.  फोर्डच्या शोरूमचे संचालक भूषण बिहाणी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्देश देताना न्यायालयाने हा तपास सीआयडीकडे द्यावा, असेही सांगितले.  


बिहाणी यांनी याचिकेत म्हटले आहे, की डिसेंबर २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत खासदार गांधी यांनी बिहाणी यांच्याकडून फोर्ड कंपनीची इंडेव्हर गाडी खरेदी केली. हवा तो क्रमांक मिळण्यासाठी त्यांनी गाडीची उशिरा नोंदणी केली. त्या दरम्यान, गाडीबाबत तक्रारी केल्या. २९ सप्टेंबर २०१५ रोजी सुवेंद्र गांधी, सचिन गायकवाड, पवन गांधी व इतर लोकांनी शोरूमचे मॅनेजर व सेल्स मॅनेजर यांचे अपहरण केले. त्यांना मारहाण करून खंडणीची मागणी करण्यात आली. त्यावेळी संबंधितांनी शोरूममधून दहा इको स्पोर्ट्स गाड्याही नेल्या होत्या. त्यातील नऊच परत करण्यात आल्या, अशी त्यांची तक्रार अाहे.

 

बिहाणी यांची थेट ‘पीएमअाे’कडे तक्रार  
बिहाणी यांनी भीतीमुळे गांधींविराेधात लवकर तक्रार केली नाही. नंतर १० ऑक्टोबर २०१६ रोजी थेट पंतप्रधानांकडे तक्रार अर्ज पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो पुढील कारवाईसाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे पाठवला. पण त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यानंतर बिहाणी यांनी २०१७ मध्ये उच्च न्यायालयात राज्य सरकार, पोलिस अधीक्षक, एमआयडीसी पोलिस ठाणे व पोलिस महानिरीक्षक यांच्या विरोधात याचिका दाखल केली हाेती. 

बातम्या आणखी आहेत...