आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले माजी सैनिक; जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशचे वृक्षारोपण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- पर्यावरणाचे असंतूलन प्रदूषणाच्या समस्येचे सर्वात मोठे संकट देशापुढे उभे असल्याने देशरक्षणाचे कार्य करुन सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक पुढे सरसावले आहेत. जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथे नुकतीच वृक्षारोपणाची मोहीम राबवली. 


गावाच्या परिसरात माजी सैनिकांनी वृक्षारोपण केले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, खजिनदार भाऊसाहेब करपे, सचिव जगन्नाथ जावळे, सहसचिव निवृती भाबड, विश्वस्त संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, रोहिदास पालवे, सरपंच भीमराज सोनवणे, मधुकर बुधवंत, बाबासाहेब गवळी, अशोक काळापहाड, अशोक सोनवणे, म्हातारदेव गिते, भाऊराव गोरे, वसंत गिते, राहुल शिरसाट, नारायण सोनवणे, शब्बीर शेख, राजेंद्र आंधळे, माजी सरंपच कैलास गिते, शहादेव गिते, चरणदास पालवे, रोहिदास पेटारे, दगडू काळापहाड, बाळासाहेब शिरसाट, आंधळे आदी उपस्थित होते.

 
प्रास्ताविकात शिवाजी पालवे यांनी माजी सैनिकांच्या पेन्शनच्या वर्गणीतून राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. सरपंच भिमराज सोनवणे यांनी देशरक्षणाच्या सेवेनंतर सामाजिक सेवेसाठी पुढे आलेल्या माजी सैनिकांच्या कार्याचे कौतुक केले. पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनत चालला असून वृक्षारोपण संवर्धन होऊन याबाबत जागृती गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावाच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला. आभार मेजर अशोक काळापहाड यांनी मानले. 
माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनतर्फे पाथर्डी तालुक्यातील धारवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शिवाजी पालवे, भाऊसाहेब करपे, जगन्नाथ जावळे, निवृती भाबड उपस्थित होते. 


युवकांनो, सैन्यात भरती व्हा... 
भाऊसाहेबकरपे यांनी गावातील युवकांना देशाच्या सेवेसाठी सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले. युवकांना भरतीसाठी फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शन देण्याची ग्वाही दिली. पाथर्डी तालुका दुष्काळी असल्याने या भागात शेतीचे उत्पन्न फारसे नाही. त्यामुळे या भागातील युवकांनी लष्करात भरती होऊन चांगले करिअर करावे, असे माजी सैनिकांना सांगितले.

बातम्या आणखी आहेत...