आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या; कर्जाच्या डोंगरापूढे थिटा पडला पोशिंदा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- रुईछत्तीशी येथील शेतकरी बाळासाहेब गणपत गोरे (५१) यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी सकाळी ११ वाजता ही घटना लक्षात आली. सततचा दुष्काळ, खर्च करूनही आलेले पीक आणि संपणारा कौटुंबिक खर्च यामुळे ते त्रस्त होते. मोलमजुरी करून त्यांचा चरितार्थ सुरू होता. त्यांच्यावर सेवा सोसायटी इतर बँकांचे कर्ज होते, पण ते भरता येणे शक्य नसल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची बोलले जात आहेत. 


त्यांच्यामागे दोन मुले, पत्नी आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे. त्यांचे जावई भरत भाऊसाहेब भुजबळ यांनी आपल्या सासऱ्यांनी शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. 


शेतकरी कर्जमाफीचा डांगोरा पिटवला जात असताना झालेली ही शेतकरी आत्महत्या प्रशासनाच्या कर्जमाफीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. 

बातम्या आणखी आहेत...