आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेच्या खूनप्रकरणी सासरा व पतीला जन्मठेप, सासूला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- विवाहितेच्या खूनप्रकरणी माजी सरपंच तथा सासरा व पतीला जन्मठेप, तर सासूला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ही शिक्षा सुनावली. नवनाथ शिवाजी काटे, शिवाजी विठोबा काटे व पार्वतीबाई शिवाजी काटे (सर्व हिवरेझरे, ता. नगर) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. 


गरीब घरची आहेस, असे म्हणत सारिका नवनाथ काटे हिचा आरोपींनी छळ केला. ९ मार्च २०१६ रोजी सकाळी सारिकाच्या अंगावर आरोपींनी रॉकेल टाकले. पती नवनाथने पेटवून दिले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या सारिकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. उपचार सुरू असताना सारिकाचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक किशोर परदेशी यांनी दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे प्रत्यक्षदर्शी, तसेच सारिकाच्या मुलाची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे अॅड. अनिल सरोदे यांनी युक्तिवाद केला. तो ग्राह्य धरत आरोपींना दोषी ठरवण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...