आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छिंदमवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा; शिवसेनेची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याने छत्रपतींबद्दल काढलेले अपशब्द शिवसेना आणि महाराष्ट्रातील जनता कदापि विसरणार नाही. भाजपचे छत्रपतींबद्दलचे बेगडी प्रेम यातून दिसून आले. शिवसेनेने हा मुद्दा सोडलेला नाही. छिंदमने राजीनामा दिल्याने प्रकरण संपलेले नाही. त्याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा शिवसेनेचे संपर्कनेते आणि पक्षनिरीक्षक विक्रम राठोड यांनी दिला. 


शिवसंपर्क अभियानानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जि. प. सदस्य शरद झोडगे, गोविंद मोकाटे, सभापती रामदास भोर, तालुकाप्रमुख गजानन भगत आदी उपस्थित होते. राठोड म्हणाले, शिवसेना विधानसभा आणि लोकसभा स्वबळावर लढणार आहे. २८८ मतदारसंघांत पक्षबांधणीसाठी ९० पक्षनिरीक्षक दौरा करणार आहेत. नगर शहर, श्रीगोंदे आणि कर्जत-जामखेड मतदारसंघ विक्रम राठोड यांच्याकडे, तर पारनेर, राहुरी आणि शेवगाव मतदारसंघ माजी आमदार संतोष भामरे यांच्याकडे आहे. 


छिंदम यास भाजपत आमदार शिवाजी कर्डिले यांनीच प्रवेश दिला. तसा कबुलीनामा छिंदमने यापूर्वीच दिला आहे. अपशब्दांबद्दल छिंदमवर जसे गुन्हे दाखल होतील, तसे गुन्हे कर्डिलेंवरही दाखल झाले पाहिजेत. छिंदम दिवसभर कोठे होता, प्रकरण दाबण्यासाठी कोणी प्रयत्न चालवले होते, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे आणि गोविंद मोकाटे यांनी यावेळी बोलताना केली. 

बातम्या आणखी आहेत...