आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील ब्रीज फिशरी कंपनीच्या व्यवस्थापकाविरूध्द गुन्हा दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- मुळा धरणातील जलाशयात विषारी औषध टाकून सुरू असलेल्या अवैध मासेमारीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या अटी व शर्तीचा भंग केल्याबद्दल नेरूळ (मंबई) येथील ब्रीज फिशरी कंपनीच्या व्यवस्थापकाविरूध्द पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 


मुळा पाटबंधारे उपविभागीय अधिकारी एन. बी. खेडकर यांनी या संदर्भात गुरूवारी फिर्याद दिली. महाराष्ट्र मत्स्य उद्योगामार्फत ब्रीज फिशरी कंपनीला १ जुलै २०१७ पासून ५ वर्षांसाठी मुळा धरणातील मत्स्य संवर्धनाचा ठेका देण्यात आला आहे. या ठेक्यातील अटी व शर्तीनुसार माशांच्या सुरक्षेची जबाबदारी ठेकेदारावर आहे. 


धरणात अवैध मासेमारी करण्यासाठी विषारी औषधाचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यावर कार्यकारी अभियंता किरण मोरे यांनी १२ मे रोजी पोलिस बंदोबस्तात धरणाच्या बॅकवाॅटर परिसराची पाहणी केली होती. काही ठिकाणी औषधांच्या बाटल्यांची झाकणे आढळून आल्याने ठेकेदाराचे सुरक्षेबाबत दुर्लक्ष होत झाल्याचे समोर आले. अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला धरणाच्या सुरक्षेबाबत सूचना देऊन कारवाईचा इशारा दिला होता. ब्रीज फिशरीच्या ठेकेदाराने ही बाब गांभीर्याने घेतली नाही. सुरक्षा रक्षक नियुक्तीत कसूर, सुरक्षा रक्षकांना ओळखपत्र दिलेली नाहीत, तसेच मासेमारीसाठी विनापरवाना बोटींचा वापर झाल्याने कंपनीच्या व्यवस्थापकाविरूध्द राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

बातम्या आणखी आहेत...