आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमधील 2 जणांचा प्रवरासंगम येथे धावत्या रिक्षाला लागलेल्या आगीत मृत्यू, 3 जण गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर/औरंगाबाद- प्रवरासंगम येथे एका सीएनजी रिक्षाने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पेट घेतलेल्या रिक्षातील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

 


जखमींना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. मुळचे औरंगाबाद येथील शहागंज येथील असलेले रहिवासी चांदा गावात साखरपुड्यासाठी गेले होते. तिथून परतत असताना ही घटना घडली.रिक्षातून एकूण पाच जण प्रवास करत होते. यामधील नमीरा शफीक कुरेशी आणि महेवीश आतीक कुरेशी यांचा मृत्यू झाला. तर समीर हनीफ कुरेशी, रफीक हाजी जाफर कुरेशी, जुनेद शफीक कुरेशी हे यात गंभीर जखमी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...