आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावेडी कचरा डेपो पेटला, दिवसभर धुराचे लोळ; ४ अग्निशमन गाड्यांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सावेडीतील वीस एकरांच्या कचरा डेपोला रविवारी सकाळी आग लागली. अग्निशमन विभागाच्या चार वाहनांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग नियंत्रणात आल्याचे दिसत असले, तरी प्लास्टिक कचरा अधिक असल्याने आग धुमसत आहे. महापालिकेकडूनही उपाययोजना करण्यात येत आहेत. 


सावेडीत वीस एकरांवर कचरा डेपो आहे. शहरात दररोज सुमारे १२५ मेट्रिक टन कचरा तयार होतो. या भागात सुमारे तीन हजार टन कचरा आहे. रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास कचरा डेपोला आग लागली. परिसरात धुराचे लोळ उठत असून नागरिक हैराण झाले आहेत. 


घटनेची माहिती मिळताच नगर मनपा अग्निशामक विभाग, श्रीगोंदे, एमआयडीसी व देवळाली प्रवरा येथील अग्निशमन विभागाच्या गाड्या सावेडी डेपोत अग्नितांडव थांबवण्यासाठी दाखल झाल्या. 


या उपाययोजना केल्या 
सावेडीचा कचरा डेपो वीस एकर क्षेत्रावर अाहे. त्यापैकी सुमारे दोन ते तीन एकर परिसरात ही आग लागली आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन विभागांच्या चार गाड्यांमार्फत उपाययोजना सुरू आहेत. पोकलेन यंत्राच्या माध्यमातून आग इतरत्र पसरू नये, यापद्धतीने कचरा बाजूला ढकलण्यात आला. आग लागलेल्या ठिकाणी एक हजार टन कचरा असल्याचा अंदाज यंत्रणांनी व्यक्त केला. 

बातम्या आणखी आहेत...