आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू महाराष्ट्र बेकर्सला आग लागून तीन लाखांचे नुकसान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड- शहरातील बीड रोड कॉर्नरजवळील न्यू महाराष्ट्र बेकर्स या दुकानाला मध्यरात्री आग लागून तीन लाखांचे नुकसान झाले. नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग लवकर अाटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. 


अमित गंभीर यांच्या मालकीचे हे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री दहा वाजता दुकान बंद करून ते घरी गेले. पहाटे चारच्या सुमारास या दुकानातून धूर येत आसल्याचे नगरपरिषदेचे कर्मचारी बाळू खेत्रे, अंकुश अदापुरे व पहाटे फिरायला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ही घटना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना कळवली. कोठारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. महावितरणच्या कार्यालयात फोन करून विद्युत पुरवठा बंद करण्यास सांगितले. दुकानाचे मालक अमित गंभीर यांनाही कळवण्यात आले. 

 

अग्निशमन दलाचे कर्मचारी अय्यास शेख, विजय पवार, शंकर बोराटे यांनी दुकानाचे शटर उचकटून पाण्याच्या साह्याने आग शमवली. दुकानातील खारी, कोल्ड्रिंक, पनीरसह फ्रीज व फर्निचर असे एकूण तीन लाखांचे साहित्य जळून खाक झाले. कोणतीही जीवितहानी झाली नाही. कांतिलाल कोठारी, पवन कांकरिया, तुषार बोरा, गौरव अरोरा, अनिल बाफना यांनी आग तातडीने शमवण्यासाठी मदत केली. 

बातम्या आणखी आहेत...