आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हजारेंच्या दिल्लीतील आंदोलनासाठी समिती; 23 मार्चपासून एल्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत २३ मार्चपासून सुरू होत असलेल्या आंदोलनासाठी राष्ट्रीय समन्वय समिती नियुक्त करण्यात आली आहे. लोकपाल, शेतीमालाला हमीभाव आदी प्रश्नी होणाऱ्या आंदोलनाच्या मुद्द्यांवर जनतेला जागवण्यासाठी हजारे यांचे देशभर दौरे सुरू आहेत.


आंदोलनाचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रीय समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.  पहिल्या टप्प्यात २० कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली असून पहिली बैठक २५ फेब्रुवारीला दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.

 

यांचा आहे कोअर कमिटीत समावेश
कोअर कमिटीत अक्षय कुमार (उडिशा), कमांडर यशवंत प्रकाश (राजस्थान), कर्नल दिनेश नैन (दिल्ली), मनिंद्र जैन (दिल्ली), विक्रम टापरवाडा (राजस्थान), दशरथ कुमार (राजस्थान), करनवीर थमन (पंजाब), प्रवीण भारतीय (उत्तर प्रदेश), सुनील फौजी (उत्तर प्रदेश), गौरवकांत शर्मा (उत्तर प्रदेश), डॉ. राकेश रफिक (उत्तर प्रदेश), पी.एन. कल्की (उत्तर प्रदेश), सुशील भट्ट (उत्तराखंड), भोपाल सिंग चौधरी (उत्तराखंड), नवीन जयहिंद (हरियाणा), शिवाजी खेडकर (महाराष्ट्र), कल्पना इनामदार (महाराष्ट्र), राम नाईक (कर्नाटक), सेरफी फ्लॅगो (अरुणाचल), सुनील लाल (उत्तर प्रदेश) यांचा समावेश आहे.

 


अण्णा हजारे म्हणाले, मोदी सरकारने निवडणूक जाहीरनाम्यात सक्षम लोकपाल लागू करण्याविषयी लेखी आश्वासन दिले होते. सत्तेवर आल्यानंतर त्याचे पालन तर झाले नाही. उलट लोकपाल, लोकायुक्त कायदा कमजोर केला. अशा परिस्थितीत भ्रष्टाचार रोखण्यासाठी सक्षम लोकपाल लागू करण्यासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळत नाही. केवळ शेतीवर अवलंबून असलेल्या 60 वर्षांवरील शेतकऱ्यांना महिना पाच हजार रुपये पेन्शन मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व्हावी, यासाठी सत्याग्रहाची गरज आहे, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...