आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोवा- निझामुद्दीन एक्स्प्रेसचे इंजिन रुळाला घासरले; अपघात थोडक्यात टळला, अनेक गाड्या रद्द

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- श्रीगोंद्यात रेल्वेमार्ग खचल्याचे गोवा-निझामुद्दीन एक्स्प्रेसच्या मोटरमनच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखून वेळीच ट्रेनवर नियंत्रण मिळवल्यामुळे संभाव्य अपघात भीषण टळला.या मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे अनेक गाड्या रद्द करण्‍यात आल्या आहेत.

 

श्रीगोंद्यात घारगावजवळ रेल्वे मार्ग खचल्यामुळे गोवा-निझामुद्दीन एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरले. रेल्वे रुळाला मोठा तडा गेला आहे. मोटरमनने प्रसंगावधान राखत वेगावर नियंत्रण मिळवले आणि मोठा अपघात टळला.

 

दरम्यान, या दुर्घटनेमुळे मनमाड-दौंड मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. या मार्गावरील अनेक पॅसेंजर आणि एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

 

अन्यथा झाला असता मोठा अनर्थ...
- घारगावच्या परिसरात रेल्वे मार्गावरील गेट बंद करुन बोगद्याचे काम सुरु आहे. यासाठी रेल्वे रुळाशेजारीच तब्बल वीस ते तीस फुटांचा खड्डा खोदण्यात आला आहे.

- रेल्वेचा वेग कमी असल्यामुळे चालकाने त्वरीत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि मोठा अनर्थ टळला.

 

केव्हा घडली ही घटना...
- काल (गुरुवार) दुपारी साधारण साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
- रुळाला तडे गेल्याने क्रेनच्या सहाय्याने इंजिन हटवण्यात आले, तर डब्यांना पाठीमागून इंजिन जोडून विसापूरला आणण्यात आले. त्यामुळे दुपारी चार वाजल्यापासून रात्री एक वाजेपर्यंत प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
- अनेक प्रवाशांची खाण्या-पिण्याची गैरसोय झाली. स्वच्छतागृहात पाणी टंचाई जाणवल्याचंही प्रवाशांनी सांगितलं.


सशस्त्र पोलिस तैनात
- कायदा सुव्यवस्था आणि लूटमार रोखण्यासाठी रेल्वेने सशस्त्र पोलिस तैनात केले होते.
- रात्री दीड वाजता खचलेला रेल्वे मार्ग पूर्ववत करण्यात आला आणि तडे गेलेल्या रुळावर दुसरा पर्यायी रुळ टाकल्यानंतर गोवा एक्स्प्रेस रवाना झाली.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...