आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर- भारताच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेसची स्थापना करण्यात आली. २८ डिसेंबरला देशभरात काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिन मोठ्या आनंदाने साजरा होतो. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सदैव जनहिताचे काम करणारा प्रथम कायम लोकप्रिय असणारा हा पक्ष आहे. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचे आदर्श घेऊन प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी पक्ष वाढवण्याचे काम करत आहे. या पक्षाने देशामध्ये अनेक बदल घडवून इतिहास रचला आहे. जोपर्यंत पृथ्वी आहे, तोपर्यंत काँग्रेस पक्षाचा इतिहास मिटणार नाही, असे प्रतिपादन नगरसेवक दीप चव्हाण यांनी केले.
शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अखिल भारतीय काँग्रेसचा १३३ वा स्थापना दिन कमिटी कार्यालयात उत्साहात केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी बाळासाहेब भुजबळ, मुन्ना चमडेवाले, गौरव ढोणे, रुपसिंग कदम, ऋषिकेश मुळे, उबेद शेख, हनिफ शेख, नलिनी गायकवाड, सविता मोरे, निजाम जहागीरदार, आर. आर. पिल्ले, जरीना पठाण, मुबीन शेख, अज्जू शेख, जाहिद शेख, किरण अळकुटे, रॉबिन साळवे, गणेश भोसले, प्रेमानंद पाडळे, दानिश शेख, मयूर पाटोळे उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले, आज जरी काँग्रेसची देशात सत्ता नसली, तरी काँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आता ज्यांची सत्ता आहे, त्यांना थापाडे भाजप सरकार असे नाव पडले आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रात भाजपने सत्ता असूनही मंत्रिमंडळात खात्यांचे वाटप पूर्णपणे केले नाही. एक-एका मंत्र्याकडे पाच ते सहा खाती असल्याने ते नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास किंवा नवीन उपाययोजना करण्यास सक्षम नाहीत. एकच खाते सांभाळायला एक मंत्री पुरा पडत नाही, तर पाच ते सहा खाते कसे सांभाळणार? यावरून असे दिसते की, यांच्याकडे मंत्रिपद देण्यासाठी सक्षम आमदार नाहीत. ज्या पक्षाकडे सक्षम लोक नाहीत, तो पक्ष देश कसा चालवणार देशातील नागरिकांना न्याय कसा देणार, असा प्रश्न नागरिकांना पडला असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.