आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जामखेड: डाॅक्टरांसह दाेन जणांवर गाेळीबार, सरपंंचपदाच्या निवडणुकीतील पराभवातून हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जामखेडमध्ये गुरुवारी हल्लेखाेरांनी केलेले कारचे नुकसान. - Divya Marathi
जामखेडमध्ये गुरुवारी हल्लेखाेरांनी केलेले कारचे नुकसान.

जामखेड - ग्रामपंचायत व सरपंंचपदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या रागातून पाटोदे (जि. बीड) येथील राजकीय गावगुंडांनी जामखेड शहरातील डॉक्टर व औषध दुकानचालकावर गुरुवारी भरदुुपारी गोळ्या झाडल्या. कारची तोडफोड करून आरोपी फरार झाले.

 

पाटोदे तालुक्यातील नाळवंडी गावात काही महिन्यांपूर्वी ग्रामपंचायत निवडणूक झाली. त्यात आपल्या पॅनेलच्या सर्वाधिक जागा निवडून येऊनही सरपंचपद व उपसरपंचपद विरोधी पॅनेलच्या ताब्यात गेल्याचा राग मनात धरून एका राजकीय गटाने जानेवारीत नाळवंडी येथील सरपंचाचे पती व अन्य सहकाऱ्यांवर हल्ला करत जीवे मारण्याची धमकी दिली होती. गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी सकाळी दहाच्या सुमारास डॉ. सादिक पठाण यांचे वडील जानमोहंमद पठाण यांच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले. नंतर त्यांनी जामखेडमध्ये राहत असलेला पठाण यांचा मुलगा डॉ. सादिक पठाण यांच्याकडे मोर्चा वळवला. डॉ. पठाण हे गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास कय्युम सुलेमान शेख, मोहसीन रफिक पठाण व आकिल सय्यद यांच्याबरोबर मारुती कारने (एमएच २३, ई ४२८९ नगरकडे चालले होते. पाठीमागून स्कॉर्पिओतून आलेल्या हल्लेखोरांनी डाॅ. पठाण यांच्या कारवर नगर रस्त्यावरील पंचायत समितीजवळ हल्ला केला. लोखंडी पाइपने कारची तोडफोड केली. एका हल्लेखोराने कारमध्ये बसलेल्या डॉ. सादिक (३५) यांना मारहाण केली.

 

हल्लेखोरांनी एकूण पाच गोळ्या झाडल्या. डॉ.पठाण यांच्या उजव्या मांडीला २ गोळ्या, तर त्यांच्या बरोबर असलेले औषध दुकानचालक कय्युम सुलेमान शेख (५०) यांच्या उजव्या मांडीवर एक गोळी लागली. दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

जिवंत काडतूस व ४ पुंगळ्या सापडल्या : घटनास्थळी १ जिवंत काडतूस व ४ पुंगळ्या सापडल्या. पाटोदे परिसरात या हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यात जानमहंमद पठाण जबर जखमी झाले. त्यांनाही नगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कर्जत-जामखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून नगर येथून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त शहरात तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...