आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणार्‍या अल्पवयीन मुलीचा खून; आरोपीस जन्मठेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणार्‍या अल्पवयीन मुलीची हत्या केल्या प्रकरणी आरोपी बाबासाहेब मिठू शिंदे (वय-32, रा. कात्रड शिवार, राहुरी, जि.नगर) याला जिल्हा सेशन कोर्टाने जन्मठेप व 50 हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्या कोर्टाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

 

सरकार पक्षातर्फे एकूण 12 साक्षीदार तपासण्यात आले. यात मुलीच्या आई-वडिल, वैद्यकीय अहवाल, तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या. आरोपी शिंदेविरुद्ध खून व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा सिद्ध झाला. खुनाबद्दल जन्मठेप व 40 हजार रुपये दंड तर पुरावा नष्ट केल्याबद्दल भादंवि कलम 201 प्रमाणे आरोपीस 3 वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

 

विहिरीत आढळला होता मुलीचा मृतदेह...

कात्रड शिवारातील गुंजाळे तलावाजवळ 27 फेब्रुवारी 2016 रोजी हे हत्याकांड घडली होती. तलावाच्या बाजूला डोंगराजवळ आशाबाई बाबाजी आवारे यांची जमीन आहे. त्यांचे पती बाबाजी आवारे हे विहिरीवर मोटार पाहण्यासाठी  गेले असता त्यांना विहिरीच्या पाण्यात मुलीचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. आवारे यांनी ही माहिती राहुरी पोलिसांना दिली होती.

 

मुलीच्या डोक्यावर वार केल्याचे स्पष्ट..
- औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन केले असता, मुलीची निर्घृण हत्या केल्याचे निष्पन्न झाले होते.
- मुलीच्या डोक्यावर वार केल्याने तिचा मृत्यू झाला होता.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा... मुलीसोबत लिव्ह इनमध्ये राहात होता आरोपी..

बातम्या आणखी आहेत...