आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्ष निवडणुकीत मूळ ओबीसींवर अन्याय : प्रमोद मंडलिक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोले- अकोले नगरपंचायतमध्ये निवडून आलेल्या चालू पंचवार्षिकच्या दुसऱ्या अडीच वर्षांसाठी बुधवारी (२३ मे) दुपारी दोन वाजता नगराध्यक्षपदासाठी सोडतीने ओबीसी महिला आरक्षणाची निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळे या जागेवर मुळ ओबीसी आरक्षणानुसार उमेदवारी देण्याची गरज असताना मात्र त्या जागेवर मुळ ओबीसी आरक्षण न देता मराठा समाजाच्या कुणबी महिलेला उमेदवारी देऊन मुळ ओबीसींच्या भावना व अधिकार पायदळी तुडवला जात असल्याची खंत अकोले नगरपंचायतचे ओबीसी समाजाचे कार्यकर्ते व शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी व्यक्त केली आहे. 


अकोले नगरपंचायतमध्ये अकोले शहरातील मुळ ओबीसी समाजाची कुचंबणा करण्यात आली असून, मुळ ओबीसींवर अन्याय झाल्याने वरिष्ठ नेतृत्वाबाबत प्रचंड संताप व्यक्त होत असल्याची भावना नगरसेवक प्रमोद मंडलिक व ओबीसी समाजाचे पदाधिकारी किरण चौधरी यांनी व्यक्त केली आहे. गत ४० वर्षे मुळ ओबीसी समाज माजी मंत्री पिचडांबरोबर असून सुद्धा सातत्याने ते मुळ ओबीसी समाजाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे राजकारण करीत आहेत. समता परिषद, नाभिक संघटना, गुरव समाज संघटना, ओबीसी एनटी संघटना, अखिल कानडी समाज संघटना, कासार समाज संघटना, सोनार समाज संघटना, शिंपी समाज संघटना, परिट समाज संघटना आदी संघटनांचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनीही आमच्याजवळ या संदर्भात नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती ओबीसी समाजाचे तालुका अध्यक्ष किरण चौधरी, नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी माध्यमांना दिली. 


यामुळे मुळ ओबीसी आरक्षणाचा लाभ इतरांना दिला जात असल्याने पिचडांबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अकोले शहरातील मुळ ओबीसीमधील माळी, साळी, कुंभार, कासार, शिंपी, सोनार, गुरव, परिट, कानडी, सुतार, न्हावी असा बारा बलुतेदार व अठरा आहुतेदारांचा मोठा समाज आहे. या मुळ ओबीसी समाजाची मोठी लोकसंख्या असून मतदारही सर्वाधिक आहेत. अशा परिस्थितीत ज्यांना मुळ ओबीसींनी मोठे नेते बनवले ते माजी मंत्री मधुकर पिचड यांनी बहुजन समाजातील नेते गायकर व नवले यांच्या दबावतंत्राला बळी पडून मुळ ओबीसीवर अन्याय करीत आहेत. या दोघांनीही अकोले शहरात आपले कार्यक्षेत्र नसतानाही त्यांच्या नात्यातील मराठा कुणबी उमेदवाराला मुळ ओबीसीच्या जागी उमेदवारी देऊन मुळ ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. त्यामुळे मुळ ओबीसी समाजात सर्वत्र नाराजी पसरली आहे. याचे परिणाम पुढील काळात दिसतील, अशी भावना देखील मुळ ओबीसी समाजाचे तालुका अध्यक्ष किरण चौधरी, नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...