आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराधार उपेक्षित वृद्धांसाठी ‘आपलं घर’ हा अभिनव उपक्रम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाळकी- एक त्रितकुटुंब पद्धतीचा ऱ्हास कुटुंब विघटन प्रक्रियेमुळे वृद्धांच्या समस्या वाढत आहेत. मी केंद्रित स्वार्थी वृत्तीमुळे वृद्धत्वाची समस्या बिकट होत आहे. वृद्धांना अडगळ मानून त्यांना बेघर केले जात असून या प्रश्नांवर समर्पित भावनेने कार्य करणे गरजेचे आहे. त्यामुळे निराधार उपेक्षित वृद्धांसाठी “आपलं घर” हा अभिनव उपक्रम आहे, असे मत धर्मदाय उपायुक्त हि. का. शेळके यांनी व्यक्त केले. 


पीस फाउंडेशन संचलित आपलं घर ज्येष्ठ सहनिवास प्रकल्पाचे उद््घाटन करताना त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक धर्मप्रांताचे बिशप डॉ. प्रदीप कांबळे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला बाल कल्याण अधिकारी विजयमाला माने, मानवाधिकार जनआंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. संतोष गायकवाड, दक्षिणायन अभियानाच्या नीलिमा बंडेलू, संध्या मेढे, प्रा.राहुल पाटोळे, प्रा.श्याम खरात उपस्थित होते. 


प्रास्ताविकात पीस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. मार्क सोनावणे यांनी प्रकल्पाच्या उभारणीमागील उद्देश सांगितला. पीस फाउंडेशनमध्ये विविध प्राध्यापक समाजकार्याचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी विश्वस्त असून सर्वांनी स्वयंखर्चातून प्रकल्प उभारला आहे, असे ते म्हणाले. 


माने म्हणाल्या, वृद्धांच्या समस्यांवर जिल्ह्यात भरीव कार्य उभे राहणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल परावलंबी असलेल्या वृद्धांचे गंभीर प्रश्न आहेत. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणे आवश्यक आहे. अॅड. संतोष गायकवाड यांनी वृद्धांच्या समस्या कशा रीतीने आपण सोडवू शकतो याबाबत मार्गदर्शन केले. बंडेलू यांनी सांगितले, देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला शांततेची गरज असून प्रत्येकाने शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. डॉ. कांबळे यांनी समर्पित समाजकार्य वृद्धांच्या प्रश्नावर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची माहिती दिली. 


निराधार वृद्ध कोणास आढळ्यास त्यांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्पाची जबाबदारी पार पाडत असलेल्या संचालिका रुपाली वाघमारे यांनी केले. या प्रकल्पाच्या यशस्विततेसाठी पीस फाउंडेशनचे सर्व विश्वस्त प्रा. मार्क सोनावणे (संस्थापक अध्यक्ष), रुपाली प्रा. सॅम्युअल वाघमारे (संस्थापक संचालक), प्रा. नीलेश गायकवाड (उपाध्यक्ष) प्रा. विजय संसारे (खजिनदार) रेव्हरंड जे. आर. वाघमारे (मार्गदर्शक) सदस्य - रेव्हरंड संदीप वाघमारे, किशोर कोल्हे, विकास वाकडे, अमित साळवे, तेजश्री पाटेकर, वंदना सोनावणे, संध्या वाघमारे हे परिश्रम घेत आहेत. सूत्रसंचालन सचिव प्रा. वाघमारे यांनी केले, तर आभार उपाध्यक्ष प्रा. गायकवाड यांनी मानले. 


पीस फाउंडेशन संचालित ज्येष्ठ सहनिवास प्रकल्पाचे उद््घाटन करताना धर्मादाय उपायुक्त हि. का. शेळके, बिशप डॉ. प्रदीप कांबळे होते, महिला बालकल्याण अधिकारी विजयमाला माने, प्रदेशाध्यक्ष अॅड. संतोष गायकवाड आदी. 

बातम्या आणखी आहेत...