आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री राम शिंदे यांचे बैठकीत निर्देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जलसंधारण तथा पालकमंत्री राम शिंदे यांनी शनिवारी जिल्ह्यातील विविध विविध विकासकामे आणि योजनांचा विभागनिहाय आढावा घेतला. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 


जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनी विखे, खासदार दिलीप गांधी, आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभारी जिल्हाधिकारी विश्वजित माने, अतिरिक्त जिल्हाधिकारी भानुदास पालवे, महापालिका आयुक्त घनशाम मंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, अधीक्षक अभियंता अनिल बोरसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील गायकवाड, तहसीलदार गणेश मरकड उपस्थित होते. 


ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या बैठकीत जिल्ह्यात लाख २९ हजार १२५ कुटुंबांपैकी लाख ७९ हजार ९०२ कुटुंंबांकडे शौचालयांची सविस्तर माहिती देण्यात आली. उर्वरित शौचालयाची कामे तातडीने पूर्ण करा, अशा सूचना शिंदे यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या. 


राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना समन्वय समिती विद्युत वितरण नियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विद्युत रोहित्र स्थितीचा आढावा घेण्यात आला. शेतकऱ्यांना विजेची आवश्यकता आहे. तातडीने विद्युत रोहित्र उपलब्ध झाले पाहिजेत. असे सांगताना शिर्डी येथे साईसमाधी शताब्दीच्या कालावधीत हाती घेण्यात आलेल्या कामाचा आढावा मंत्र्यांनी घेतला. जिल्हा पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेताना राष्ट्रीय पेयजल योजनेचा आढावा घेण्यात आला यामध्ये जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची सद्यस्थिती, दुरुस्ती देखभाल प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला. पाणी पुरवठा संबंधी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. 

बातम्या आणखी आहेत...