आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेत फर्निचरच्या झालेल्या कामात अनियमितता; वाकचौरे यांची चौकशीची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषदेने नवीन प्रशासकीय इमारती नव्याने तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम झालेल्या पंचायत समितीच्या कार्यालयाच्या सभागृहात फर्निचर करण्यात आले आहे. सदरचे काम शासनाच्या निधीतून झाले आहे. या कामांत झालेल्या अनियमिततेची मंत्रालय स्तरावरुन चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा परिषदेचे भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी गुरूवारी केली. 


याबाबत वाकचौरे यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांना पत्र दिले.जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून फर्निचर काम २००७ ते २०१६ या कालावधीत झाले आहे. या कामांना तांत्रिक प्रशासकीय मान्यता देताना शासन निर्णयानुसार फर्निचरचे कामे नोंदणीकृत एजन्सीला देणे क्रमप्राप्त असते. असे असताना जिल्हा परिषदेतील संबंधित कार्यकारी अभियंता दक्षिण उत्तर विभाग, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा वित्त अधिकारी यांनी संगनमताने नियमाची पायमल्ली करुन अनधिकृतपणे एकाच ठराविक एजन्सीला अार्थिक हितसंबंधाने कामे दिली. काही कामांना निधी अप्राप्त असताना अन्य योजनेतून देयके संबधित एजन्सीला मुदतीत देण्यात आली.शासन निर्णयानूसारच जिल्हा परिषदेने ही एजन्सीला देणे क्रमप्राप्त असताना ज्या एजन्सीने शासनाकडेच आय एक, आय दोन, आय तीन आय रजिस्ट्रेशन नोंदणी केलेल्या नगर मधील एकाच एजन्सीला कामे दिली. सदरची कामे देताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार निकृष्ट दर्जाचे कामे झाल्याचे चौकशीनंतर समोर येईल. 


सदर फर्निचरची कामे ही एजन्सी संबंधित विभागातील खातेप्रमुख यांनी एकत्रित करण्यात आली आहे. या कामाची मंत्रालय स्तरावरुन चौकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर एजन्सी बडतर्फ संबंधित अधिकाऱ्यांकडून शासनाचा निधी अपहार झाल्याने हा निधी खाते प्रमुखांकडून वसूल करावा, अशी मागणी वाकचौरे यांनी केली आहे. 

बातम्या आणखी आहेत...