आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एक कोटीच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करून खून; तिघांना जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- एक कोटीच्या खंडणीसाठी मित्राचे अपहरण करत खून केल्याप्रकरणी तिघांना येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. डी. पाटील यांनी गुरूवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष म्हणजे एकही प्रत्यक्ष साक्षीदार नसताना केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे ही शिक्षा सुनावली. 


गणेश गोरक्षनाथ चांदगुडे (चासनळी, कोपरगाव) हा मामा सुनील सीताराम दौंड (मातापूर, श्रीरामपूर) यांच्याकडे राहण्यासाठी आला होता. बोरावके महाविद्यालयात तो बारावीत शिकत होता. १२ मार्च २०१५ रोजी मित्राच्या घरी सीईटीचा अभ्यास करण्यासाठी जातो, असे सांगून गणेश घरातून बाहेर पडला. अजय दिनकर मोरे, पराग मच्छिंद्र पटारे व धीरज शंकर शिंदे या मित्रांनी त्याला पळवून नेले. नंतर त्याच्या आईच्या मोबाइलवर मेसेज पाठवून एक कोटीच्या खंडणीची मागणी त्यांनी केली. मित्रांनी गणेशला नेवासेफाटा येथे दारू पाजून नगर-औरंगाबाद रस्त्याने गंगापूर हद्दीमध्ये नेले. तेथे त्याच्या डोक्यात दगड टाकून पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. एकूण २६ साक्षीदार तपासले. दंडाच्या रकमेपैकी १० हजार रुपये मृताची आई मिनाक्षी चांदगुडे यांना देण्यात येणार आहेत. फिर्यादी सुनील दौंड यांच्या अर्जावरून जिल्हा सरकारी वकील सतीश पाटील यांनी ॲड. भानुदास तांबे यांची नेमणूक केली होती. 

बातम्या आणखी आहेत...