आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील हंगामातही साखरेच्या दरवाढीची शक्यता कमी; कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांचे मत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- देशात व जगात साखरेचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. पुढील हंगामातही ऊस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे साखरदरात वाढ होण्याची शक्यता कमी आहे. अन्न व पुरवठा विभागाने २० लाख टन साखर निर्यात करण्याचे जाहीर केले असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील दराचा विचार केल्यास साखर निर्यात होऊ शकणार नाही, असे मत काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी व्यक्त केले. 


काळे साखर कारखान्याच्या ६३ व्या गळीत हंगामाच्या सांगतेप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते. संचालक मीननाथ बारगळ व त्यांच्या पत्नी सीता यांच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा झाली. आशुतोष काळे म्हणाले, हंगामाचा प्रारंभ करताना शेतकी विभागाने ५.५० लाख टन गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला. परंतु ६,३१,६६८ टन गाळप झाले. कार्यक्षेत्रातून ३,९५,९२३ टन व कार्यक्षेत्राबाहेरून २,३५,७४४ टन ऊस गाळण्यात आला, ६,५९,३०० क्विंटल साखर उत्पादन होऊन सरासरी १०.४३ साखर उतारा मिळाला. हंगामाच्या सुरुवातीला जो दर दिला, तोच दर शेवटच्या उसाला दिल्याचे काळे यांनी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष सूर्यभान कोळपे, कार्यकारी संचालक जी. जे. जगताप, आसवनीचे जनरल मॅनेजर जे. ए. भिडे, कारखान्याचे जनरल मॅनेजर ए. व्ही. काळे, सेक्रेटरी एस. एस. कोल्हे, ऑफिस सुपरिटेडेट बी. बी. सय्यद, चीफ इंजिनियर डी. बी. चव्हाण, शेतकी अधिकारी के. व्ही. कापसे, चीफ केमिस्ट एस. जे. ताकवणे उपस्थित होते. 


प्रभावी धोरण हवे... 
पाकिस्तान सरकारने अनुदान देऊनही साखर निर्यात होऊ शकली नाही. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी ३५०० ते ३६०० रुपये असलेला साखरेचा दर २५५० रुपयांपर्यंत खाली आला होता. ९५० रुपयांनी दर घसरल्यामुळे शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे साखर उद्योगापुढे अडचणी वाढल्या आहेत. साखर उद्योगाला यातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी धोरण राबवण्याची गरज अाहे, असे आशुतोष काळे म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...