आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे पावसात भिजले का : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- भाजपचे सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेस राष्ट्रवादीसह अन्य समविचारी पक्षांना बरोबर घेणार आहे, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट करून सत्तेतून बाहेर पडण्याबाबत बोलण्याचे शिवसेनेचे द्विशतक झाले आहे. शिवसेनेने खिशात ठेवलेले राजीनामे पावसात भिजले का? अशी खोचक टीका त्यांनी केली. 


जिल्हा बँकेत आयोजित पत्रकार परिषदेत विखे बोलत होते. कर्नाटकात जे घडले त्याबद्दल तेथील राज्यपालांना बडतर्फ करावे. आता परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आगामी काळात परिवर्तन घडेल. देशात विरोधी पक्ष एकत्र येत आहे. भाजप विरोधात महाराष्ट्रातही सर्व पक्षांना एकत्रित आणले जाईल. त्यात माझी समन्वयकाची भूमिका असेल. भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी झाले आहे.सत्तेतून बाहेर पडण्याबाबत बोलण्याचे शिवसेनेचे द्विशतक झाले आहे. सचिन तेंडूलकरलाही त्यांनी मागे टाकले आहे. शिवसेनेने खिशात ठेवलेले राजीनामे पावसात भिजले का? असा टोला त्यांनी लगावला. संविधानाची भाषा बोलणाऱ्या भाजपला कर्नाटकातून चांगली चपराक बसली आहे, असे त्यांनी सांगितले. केडगावची घटना ही वैयक्तिक वादातून झाल्याचा त्यांनी पुनरूउच्चार केला. 


कर्नाटकात लोकशाहीची हत्या होताहोता वाचली 
कर्नाटकात लोकशाहीची हत्या होताहोता वाचली. कर्नाटकात अल्पकाळात सरकारला पायउतार व्हावे लागले. भाजप सत्ता-संपत्तीच्या जोरावर तेथे सरकार ते स्थापन करणार होते. मात्र, सर्वाेच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे तेथे चांगली चपराक बसली. लोकशाही मंदिरात बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांना हा झटका बसला आहे. हा लोकशाहीचा मोठा विजय आहे, असे विखे म्हणाले. 


पवार-गांधी निर्णय घेतील 
राज्यात विरोधी पक्षासह समविचारी पक्षांना एकत्र आणण्यासाठी मी समन्वयकाची भूमिका बजावणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी एकत्र बसून याबाबत निर्णय घेतील. आंध्रप्रदेश सरकारचे जे वाळूबाबत धोरण आहे. ते धोरण महाराष्ट्र सरकारने घ्यावे, अशी मागणी विखे यांनी केली. 


प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील 
शहर व जिल्हा काँग्रेसमध्ये मरगळ आल्याबाबत त्यांना विचारले असता तसे काही नाही, असे सांगून यावर अधिक बोलणे टाळले. जिल्ह्याला प्रभारी जिल्हाध्यक्षपद देण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. कायम जिल्हाध्यक्षपदाबाबत त्यांनी तो निर्णय प्रदेशाध्यक्ष घेतील, असे विखे यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...