आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान; मोठ्या शर्थीनंतर बाहेर काढण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- खंडाळा येथे शुक्रवारी मध्यरात्री विहिरीत पडलेल्या बिबट्याला मोठ्या शर्थीनंतर क्रेनच्या मदतीने शनिवारी सकाळी आठ वाजता बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. हा दोन वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या असून तो सुरक्षित असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.


अरूण मुरलीधर ढोकचौळे यांच्या विहिरीत बिबट्या पडला होता. पोहून थकल्यानंतर एका कोपऱ्यात जाऊन तो बसला होता. सकाळी वीजपंप सुरू करण्यासाठी गेलेल्या ढोकचौळे यांच्या हा प्रकार लक्षात आला. थोड्याच वेळात बघ्यांची गर्दी झाली. वनरक्षक बी. बी. झिंजुर्डे, वनपाल गावडे कर्मचारी गोरक्षनाथ सुरासे घटनास्थळी आले. विहिरीतील पाण्यामुळे बिबट्याला बाहेर काढणे कठीण बनले. त्यातच बघ्यांच्या गर्दीने अडथळा येत होता. तासाभराच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढण्यात आले. सहायक वनरक्षक रमेश देवखिळे वनपरीक्षक एस. एम. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला पिंजऱ्यात टाकून सुरक्षित स्थळी नेण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...