आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

60 वर्षांनंतर जीवनात प्रकाश; कांबळे यांच्या डोळ्यावर यशस्वी शस्रक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निघोज- बाराखडी गिरवण्याच्या वयात त्यांची दृष्टी गेली अन् अवघं भविष्यच अंधकारमय झाले. निराशेने ग्रासलेले असताना वयाच्या ६६ व्या वर्षी म्हणजे ६० वर्षांनी त्यांना दृष्टी प्राप्त झाली. शिरूर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर यांच्या प्रयत्नांतून निमगाव म्हाळुंगे येथील बाळू नाना कांबळे यांच्या आयुष्यात शेवटच्या टप्प्यात उमेदीची ज्योत प्रज्वलित झाली. 


तापामुळे कांबळे यांची दृष्टी गेली. त्यामुळे शाळेत प्रवेश घेण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. अंधारमय जीवनाचा प्रवास सुरू झाला. शेतीवर अवलंबून असलेल्या कांबळे कुटुंबाने आपल्या अंध मुलाचा सांभाळ केला. तारुण्याच्या उंबरठ्यावर विवाहाचा विषय आला असता मावसभावाने आपली मुलगी अंध भाच्यास दिली. अंधत्वामुळे कांबळेंना कामधंदा करता आला नाही. मात्र, त्यांच्या पत्नीने घरातील दुधाचा धंदा सांभाळला. वेळप्रसंगी शेतात खुरपणीचे कामही केले. 


गुजरात येथील एका कामगाराच्या डोळ्यात प्लास्टिक पडून दृष्टी गेली होती. डॉ. भालेकर यांनी ही शस्रक्रिया केली होती. कांबळे यांना ही माहिती मिळाल्यावर त्यांनी डॉ. भालेकर यांची भेट घेतली. शेवटचा प्रयत्न म्हणून शस्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. कांबळे यांची दुर्दम्य इच्छाशक्ती डॉ. भालेकर यांच्या कौशल्यामुळे साठ वर्षांनंतर कांबळे यांच्या जीवनात आशेचा किरण प्रज्वलित झाला. 


ती व्यथा झाली दूर 
ज्यांनीजन्म दिला त्या आई-वडिलांना कांबळे यांना लहानपणी, दृष्टी जाण्याआधी पाहता आले. जिच्याशी लग्न केले, तिला मात्र पाहता येत नाही, याचे शल्य त्यांना नेहमीच असायचे. तीन-चार वेळा पुण्यातील नेत्रतज्ज्ञांकडे नेत्र तपासणी करूनही यश आले नाही. आता ही व्यथा दूर झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...