आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोडा, जबरी चोरीप्रकरणी पोकळे टोळीविरोधात मोक्का; दोन आरोपींना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहरासह जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी सर्व गुन्हेगारांची कुंडली काढली आहे. संघटित गुन्हे करणाऱ्यांच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे प्रस्ताव पोलिसांनी तयार केले आहेत. दरोडा जबरी करणाऱ्या दीपक अंबादास पोकळे याच्या टोळीच्या विरोधात मोक्कांतर्गत केलेली कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे. टोळीतील दोघांना अटक केली असून जिल्ह्यातील इतर गुन्हेगारी टोळ्यांच्या विरोधातही अशीच कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शर्मा यांनी मंगळवारी दिली.

 

दीपक अंबादास पोकळे (लोहारे, ता. संगमनेर, हल्ली रा. साकुरी, ता. राहाता), दादू ऊर्फ रामनाथ गोरख मोरे (पिंपळवाडी रस्ता, ता. राहाता), अक्षय अप्पासाहेब दाभाडे (नांदुर्खी, ता. राहाता), किशोर चांगदेव दंडवते (गोदावरी वसाहत, साकुरी, ता. राहाता) अशी मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अक्षय दाभाडे किशोर दंडवते या आरोपींना अटक करण्यात आली आहे. टोळीचा मोरक्या दीपक पोकळे दादू मोरे यांना ताब्यात घेण्यासाठी शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधीक्षक, त्यांची स्थानिक गुन्हे शाखा, तसेच नगरमधील चार पथके तैनात करण्यात आली आहेत. दोन्ही आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यात येणार आहे. या चारही आरोपींनी १८ नोव्हेंबर २०१७ रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास साकुरी शिवारातील प्रमोद अण्णासाहेब गाढे यांच्या बांबू हाऊस हॉटेलमध्ये गोळीबार करत दहशत निर्माण केली होती. आरोपींनी हॉटेलमध्ये घुसून जेवण पार्सल देण्याची मागणी केली. फिर्यादी गाढे यांनी त्यांच्याकडे अगोदर बिल देण्याची मागणी केली. त्याचा राग आल्याने तू आम्हाला ओळखत नाहीस काय, मी दीपक पोकळे मला बिल मागतो, तुला हॉटेलचा धंदा चालवायचाय का, असे म्हणत पिस्तुलातून गोळीबार केला. किशोर दंडवते याने चाकू दाखवत दमबाजी केली. गाढे यांच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी गाढे यांच्या फिर्यादीवरून आरोपींच्या विराेधात कलम ३९७, ३९२, तसेच आर्म अॅक्ट ३- २५ ४- २५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींना अटक केली, तर उर्वरित दोन आरोपींना लवकरच अटक करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

 

इतर टोळींच्या विरोधाही मोक्का
शहर जिल्ह्यात संघटीत गुन्हे करणाऱ्या टोळींच्या विराेधात देखील मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे. या टोळ्यांच्या विरोधात पुरावे म्हणून जास्तीत जास्त कागदपत्रांच्या आधारे मोक्कांतर्गत कारवाईचे प्रस्ताव तयार करण्यात येणार आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच एका टोळीच्या विरोधात मोक्कांतर्गत कारवाईस नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली. कारवाईचे इतर प्रस्ताव लवकरच सादर करण्यात येणार असल्याचे पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...