आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिरोबावाडीच्या शेतकऱ्यांचे महावितरणसमोर ठिय्या आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- तालुक्यातील किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल, करंदी या गावांसह कान्हूर पठार उपविभागांतर्गत येणाऱ्या सर्व गावांचा शेतीचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी पासून थकबाकी वसुलीसाठी महावितरणने बंद केला. त्यामुळे संतापलेल्या बहिरोबावाडी येथील शेतकऱ्यांनी दुपारी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात तब्बल अडीच तास ठिय्या आंदोलन केले. आंदोलनाची दखल घेत कार्यकारी उपअभियंता प्रजापती यांनी कान्हूर पठारचे कनिष्ठ उपअभियंता पाटील यांना दूरध्वनी करून खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले. खंडित वीजपुरवठा सुरू करण्यात आल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले. 


किन्ही, बहिरोबावाडी, तिखोल, करंदी आदी गावांचा शेतीचा वीजपुरवठा महावितरणने कुठलीही पूर्वसूचना देताच गुरुवारी वीजबिल वसुलीसाठी खंडित केला. बहिरोबावाडी येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, तोपर्यंत अडीच तास शेतकरी तेथेच बसून राहिले. सरकार महावितरणच्या विरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीकडून आकारण्यात येणारे बिल अतिशय सदोष चुकीचे असते. मोघम बिल आकारण्यात येत असल्याने जोपर्यंत बिले दुरुस्त होत नाहीत, तोपर्यंत शेतकरी ते भरणार नसल्याचे अनिल देठे यांनी सांगितले. 


महावितरणचे कार्यकारी उपअभियंता प्रजापती हे राळेगणसिध्दी येथे बैठकीत असल्याने त्यांनी कान्हूर पठारचे कनिष्ठ अभियंता पाटील यांना आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी पाठवले. पाटील यांनी सकारात्मक चर्चा करून वीजपुरवठा सुरू केल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात किन्हीचे सरपंच बाबासाहेब व्यवहारे, छगन भांबरे, संजय व्यवहारे, पांडुरंग व्यवहारे, बापू व्यवहारे, विठ्ठल देठे, आदिनाथ व्यवहारे, बबन देठे, भास्कर देठे, मल्हारी व्यवहारे सुनील साबळे, सुदाम देठे, भिकाजी व्यवहारे, किरण व्यवहारे, मोहन मोढवे, संपत पवार, रोहिदास खोडदे, सुनील खोडदे, राजेंद्र व्यवहारे, बबन शिंदे, बाळू शिंदे, योगेश व्यवहारे, प्रवीण व्यवहारे, पोपट व्यवहारे, संदीप व्यवहारे, संतोष व्यवहारे, कुंडलिक देठे, संजय साकुरे आदी शेतकरी सहभागी झाले होते. 

बातम्या आणखी आहेत...